Women's T20 WC : पराभवानंतर भारताची कर्णधार ढसाढसा रडली; व्हिडीओ व्हायरल

भारतीय महिला क्रिकेट संघाचा (Women's T20 WC) टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला
Women's T20 WC : पराभवानंतर भारताची कर्णधार ढसाढसा रडली; व्हिडीओ व्हायरल

आयसीसी टी - २० विश्वचषकावर (Women's T20 WC) नाव कोरण्याचे भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. भारताच्या महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत आयसीसी महिला टी - २० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मात्र, यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय संघाला पारभाव पत्करावा लागला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना अटीतटीचा ठरला होता. यावेळी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kour) आजारी असूनही देशासाठी झुंजार खेळी करत ५२ धावा केल्या. मात्र, त्यानंतर बाद झाल्याने दुखी झालेली हरमनप्रीत सामन्यानंतर भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राला (Anjum Chopra) मिठी मारत रडताना दिसली.

हरमन अंजुम चोप्राला मिठी मारत रडत असतानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एकीकडे हरमन रडत असताना अंजुम चोप्राचीही अशीच परिस्थिती होती. हिंदी समालोचक म्हणून या सामन्याचे समालोचन करत असताना जेव्हा भारताचा पराभव झाला, तेव्हा तीही भावूक झाली होती. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.

हेही वाचा :

अंतिम फेरीची हुलकावणी! ऑस्ट्रेलियाला झुंज देऊनही भारताचा पाच धावांनी पराभव

याबद्दल अंजुम चोप्रा म्हणाल्या की, "मला हरमनला एक भावनिक आधार द्यायचा होता. हरमनची तब्येत बिघडली असतानाही ती मैदानात उतरली. दुसरा सामना असता तर कदाचित ती खेळलीसुद्धा नसती. पण ती उपांत्य फेरी होती म्हणून मागे हटली नाही. हरमन फलंदाजी करत होती तेव्हा भारताच्या विजयाची एक उमेद निर्माण झाली होती. जेमिमाने तिला खूप चांगली साथ दिली.'

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in