भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून नागरिकांवर शेरेबाजी केली जात असल्याचा जाब विचारणे ६५ वर्षीय रिक्षाचालकाच्या जिवावर बेतले. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक
भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भिवंडी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून नागरिकांवर शेरेबाजी केली जात असल्याचा जाब विचारणे ६५ वर्षीय रिक्षाचालकाच्या जिवावर बेतले. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जमीर मोहम्मद कासीम मोमीन (६५) असे मृताचे नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक
Mumbai : लोकलमध्ये पैशांसाठी प्रवाशाला मारहाण; व्हायरल VIDEO नंतर दोन ट्रान्सजेंडर पोलिसांच्या ताब्यात
भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक
Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

जुना ठाणे रोड परिसरातील समदनगर येथे जमीर मोमीन जात असताना काही तरुणांकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर शेरेबाजी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारण्यासाठी ते मोहम्मद अली सलीम अहमद मोमीन (१९), हमजा उस्मान मोमीन (२०) आणि नबीग इम्रान मोमीन (३०) यांच्याकडे गेले. यावेळी बाचाबाची होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी सलीम अहमद मोमीन, मोहम्मद अली मोमीन आणि अन्य आरोपींनी जमीर मोमीन यांना बेदम मारहाण केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in