Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

मुंबईतील अंधेरी-विरार लोकलमध्ये १०-१२ जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
Published on

मुंबई : नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या मयंक लोहार हत्याकांडाची घटना ताजी असतानाच मुंबई लोकलमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरी-विरार लोकलमध्ये १० ते १२ तरुणांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धावत्या लोकलमध्ये तरुणाला बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली आणि दहिसर स्थानकादरम्यान धावणाऱ्या अंधेरी-विरार लोकलमध्ये हा प्रकार घडला. १० ते १२ तरुणांच्या समूहाने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये काही जण लोकलच्या हँडरेलला लटकलेले, सीटवर उभे राहून संबंधित तरुणाला वारंवार मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार

या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकलमधील आणखी एका मारहाणीच्या व्हिडिओचीही दखल

दरम्यान, सोशल मीडियावर धावत्या मुंबई लोकलमधील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन ट्रान्सजेंडर महिलांकडून एका व्यक्तीला मारहाण होताना दिसत आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेल्वे प्रशासनाने या घटनेचीही दखल घेतली असून, संबंधित माहिती गोळा केली जात आहे.

मयंक लोहार हत्याकांडानंतर पुन्हा सुरक्षेचा प्रश्न

Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार
Mumbai : अंधेरी-विरार लोकलमध्ये तरुणाला १०-१२ जणांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
महिलेची छेड काढणं पडलं महागात! रेल्वेतच तरुणाला घातल्या बांगड्या, लिपस्टिक लावत शिकवला धडा; VIDEO

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नालासोपारा लोकलमध्ये मयंक लोहार यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. मुसळधार पाऊस आणि लोकलमधील गर्दीच्या पार्श्वभूमीवर दरवाजा उघडा ठेवायचा की बंद, या वादातून आरोपीने चाकूने वार करून मयंक लोहार यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतरही मुंबई लोकलमध्ये मारहाण आणि हिंसाचाराच्या घटना समोर येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in