डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ
अडचणींवर मात कराल
कुंभ राशीचे चिन्ह म्हणजे खांद्यावरती रिकामा कुंभ घेऊन उभा असलेला मानव या आकृतीस कुंभ राशी म्हणतात. संशोधक वृत्ती संग्रहक वृत्ती ज्ञानपीपासा धारण शक्ती बुद्धीची प्रगल्भता अलौकिक स्मरणशक्ती लोकोत्तर बुद्धिमत्ता वक्तृत्व परोपकार असे श्रेष्ठ गुण कुंभ राशींच्या जातकांमध्ये आढळतात. पाश्चात त्यांच्या मते घागरीतील पाणी ओतत असलेला मानव असे कुंभ राशीचे चिन्ह मानतात विद्यावान वक्तृत्व प्रवीण असे प्रमुख गुण कुंभ राशींच्या जातकांमध्ये आढळतात वायु तत्वाची रास आहे. तशी बुद्धीची राशी आहे. ही राशी लग्नात बलवान असते त्याचप्रमाणे कुंभ रास ही दिवसा बलवान असते.
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी आपल्याला ग्रहामध्ये साथ अल्प प्रमाणात मिळणार आहे. पण कुंभ राशी बुद्धीला प्राधान्य देणारी रास असल्याकारणाने यश मिळवून देणारी रास आहे. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही. कठोर परिश्रम घ्यावया पाहिजे. प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. परदेशासंबंधी पण प्रयत्न त्यांना यश मिळू शकते कला व क्रीडा क्षेत्रात आपल्याला बाहेरून मदत मिळू शकते तसेच नवीन नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. इतरत्र वेळ वाया न घालवता वेळेचे नियोजन करून त्याचा सुयोग्य प्रमाणात वापर करावा ते हिताचे ठरेल.
पारिवारिक : कुटुंब परिवारामध्ये समज गैरसमज लहान सहान कारणांवरून निर्माण झाल्याकारणाने काही वेळेस कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहणार नाही. आपल्याला स्वतःला वातावरण शांत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. मतभेद दूर करावे लागतील. अर्थात त्यासाठी आपल्याला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मुदत मिळू शकते. संयम राखायला पाहिजे. भावंडांमधली भांडणे अथवा मतभेद उग्र स्वरूप काही वेळेस धारण करू शकतात. म्हणून त्यापासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुटुंबातील शांततेसाठी आपण वेळेसच पुढाकार घेणे जरुरी राहील.
नोकरी, व्यवसाय, धंदा : सदरील काळाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात अर्थातच नोकरी धंदा व्यवसायामध्ये निरनिराळ्या स्वरूपाच्या अचानक अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे मनस्वास्थ्य बिघडून जाऊ शकते. चालू नोकरीमध्ये अनपेक्षित घटना घडवून वरिष्ठांचे रोष पत्करावे लागतील. महत्त्वाची कामे थांबतील.बरोबरचे सहकारी सहकार्य देणार नाहीत. अपेक्षित कामे पूर्ण होणार नाहीत. त्याचप्रमाणे व्यवसाय धंद्यात कामगारांचे प्रश्न उद्भवल्यामुळे चिंताक्रांत व्हाल. त्याचप्रमाणे व्यवसाय धंद्यात जास्तीची आर्थिक मदत लागल्यामुळे विचारात पडेल. परंतु कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर आपण आपल्या बुद्धी कौशल्याने मात करू शकाल फक्त शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. गोंधळून जाऊ नका आत्मविश्वास टिकवून ठेवण्याची गरज आहे. मोठ्या प्रकारच्या अडचणीतून सहज निभावून जा कुटुंब परिवारात सुद्धा आयत्या वेळेस काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील परिवारातील सदस्यांच्या बरोबर वादविवाद टाळा.
शुभ दिनांक : 6,7,9,10,11,14,17,19,22,28
अशुभ दिनांक : 2,5,13,16,18,21,23,30,31
मीन
चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील
मीन माशांच्या उलट सुलट असलेल्या आकृतीस मीन रास म्हणतात. हे दोन मासे उलट सुलट तोंड असलेली आहेत दुर्बलांवर आक्रमण करणे व प्रबलांची नमते घेणे हे नैसर्गिक गुण मीन राशी असलेल्या जातकांच्या मध्ये दिसतात. तसेच भित्रेपणा जलविहाराची आवड सुंदर व टपोरे डोळे चंचलता तजेलदारपणा कधी कधी अतिशय कमी आत्मविश्वास इतरांच्या सल्ल्याची आवश्यकता आपल्याच जात बांधवांवर स्वतःची उपजीविका करणे हे मीन राशी असलेल्या जातकांचे विशिष्ट गुण असतात. मीन रास ही बहुप्रसव राशी आहे. तसेच या राशीचे तत्व जल आहे. ही राशी चतुर्थस्थानात बलवान होते मीन रास ही संध्या समयी बलवान असते.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आपल्याला लाभला असल्यामुळे त्याचा आपण फायदा जरूर घ्या. आपल्या केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल व प्रयत्न सुद्धा योग्य दिशेने होते. मार्गदर्शन मिळेल, अभ्यासामध्ये लक्ष लागेल. त्यामुळे यश पण मनाप्रमाणे मिळेल स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धात्मक यश प्राप्त करू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल संधी मिळतील. परदेशासंबंधी शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्न करायला पाहिजेत. आपण योग्य दिशेने प्रयत्न करत आहे किंवा कसे हे वेळोवेळी तपासून बघणे आवश्यक आहे. इतरांचे मार्गदर्शन घ्यावे. इतरांची मुदत घ्यावी अति आत्मविश्वास टाळावा.
पारिवारिक : कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. कुटुंब परिवारातील सदस्य आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकतील. कुटुंबात एकोपा राहील. एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी विषयीचे प्रश्न संपुष्टात येतील.ओळखीमध्येच उपयोगी पडतील तसेच विवाह ठरविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून चांगल्या वार्ता येतील. परंतु त्यांच्या शिक्षणासाठी जास्तीचा खर्च करण्याची गरज लागेल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : सध्याचा कालावधी म्हणजे कायदेशीर बाबतीत जपून राहण्याचा आहे. सावध राहण्याचा आहे. आपले कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब होता कामा नये अथवा करू नये. सर्व कार्य कायद्याच्या चौकटीतच बसवून कार्य पूर्ण करणे. कोणताही व्यवहार तो लहान असो अथवा मोठा त्याची कायदेशीर बाजू तपासल्याशिवाय तो पूर्ण करू नये. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या क्षमतेचाही विचार अपरिहार्य ठरतो. विशेषतः सरकारी कामांच्या बाबतीत अचानक त्रास अथवा मनस्ताप उद्भवू शकतो. नोकरी धंदा व्यवसायात आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे ठरेल. कोणतेही राजकारण करण्यापासून प्रवृत्त होऊ नका. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये चढत्या क्रमाने शुभ फळे प्रतिपादित होतील. सदरील काळात आपल्या जीवना मध्ये स्थैर्य येऊन सुख सुविधांमध्ये वृद्धी होईल. घरासंबंधीचे प्रश्न सुटतील.
शुभ दिनांक : 6,7,9,10,14,19,25,26
अशुभ दिनांक : 2,5,13,16,18,21,23,30,31