आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 10, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : संयमाने वागणे आवश्यक. नवीन ओळख झालेल्यांची अती मैत्री नका. व्यवहार करताना फार दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नव्या संकल्पनासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ: रास-मनासारखी आर्थिक प्राप्ती असणार आहे. त्यामुळे कार्य उत्साहाने कराल.मित्र परिवारामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहार निश्चितच टाळा. प्रवासात मोठा त्रास संभवतो.

मिथुन : आज आपणास अडचणीच्या मार्गातून काम करावे लागेल.अडचणींवर मात करावीच लागेल. कर्ज देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे. या कामासाठी प्रवास करावा लागेल .

कर्क : कामाचे स्वरूप वाढणार आहे. आपले नियोजन व्यवस्थित होणार आहे. कामे मार्गी लावाल. व्यवहार पूर्ण करून फायदे होतील. कुटुंबामधील वातावरण आनंदमय राहील.

सिंह : आजचा दिवस यशस्वी जाणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. जोडीदाराचा सल्ला ऐका. नवीन काही शिकण्यासारखे असेल तर त्याची माहिती घ्याल.

कन्या : कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह येईल. योग्य ठिकाणी वर्चस्व दाखवण्याची संधी मिळेल. दुसऱ्या व्यक्तींचे दोष दाखवत बसू नका वेळ जाईल.

तूळ : रखडलेली कामे मार्गी लावायचा प्रयत्न करा ,कामाची क्रमवारीठरवून घ्या. मोठे व्यवहार करताना वरिष्ठ किंवा तज्ञ यांचा सल्ला मोलाचा ठरेल. कामामध्ये सातत्य ठेवा.

वृश्चिक : प्रिय व्यक्तीचा सहवास समाधान देईल. आर्थिक गुंतवणूक वाढवणार आहात. मनाजोगता पैसा मिळेल बुद्धिचातुर्य व अंगी असलेले कला गुण यामुळे कामाचे सोने कराल.

धनु : आपली नेमकी उद्दिष्टे कोणती हे ठरवून वागण्याचा कालावधी, नोकरी व्यवसायातील नवीन कार्यभाग व अनुषंगाने वाढत्या जबाबदाऱ्यांचा योग्य समन्वय तुम्हाला साधावा लागेल.

मकर : आपल्या सहवासातील व्यक्तींचा प्रभाव भाव आपल्यावर पडत नाही याची खात्री करून घ्या. व्यवहार करताना व्यवहार नीट समजून घ्या .कोणतीही चूक होत नाही याची काळजी घ्या.

कुंभ : आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीमध्ये काम भरपूर असल्यामुळे हाताखालील व्यक्तींची साहाय्य घ्यावे लागेल. कामाचा ताण येऊ देऊ नका. काम व्यवस्थित नियोजनपूर्वक होईल.

मीन : नोकरी-व्यवसायात तुमच्या संकल्पना अमलात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आपणास सहज शक्य अशी काम होतील.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग