आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 10, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी येतील. त्या चांगल्या प्रकारे आपण अमलात आणाल. आपल्या स्वतःच्या धाडसाने आणि बुद्धिमत्तेने व्यापार व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ : आपणाला ताणतणावातून आणि अडचणीतून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन : आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. काही धाडसी निर्णय घ्याल. त्यामध्ये चांगले यश येणार आहे. लोकप्रियता मिळेल .प्रेमासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कर्क : काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहात. मित्रमंडळी सोबत आणि कुटुंबीयांचशी चांगले संबंध असणार आहेत. कौटुंबिक वर्तुळात आनंद असेल.

सिंह : आज आपण आपल्या कामाकडे पूर्णपणे लक्ष देणार आहात. हा वेळ आणि देव तुमच्या बाजूने आहे. तुमच्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे.

कन्या : आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होऊन चांगला मोबदला मिळणार आहे .आर्थिक प्रगतीचे होणार आहे .एखादी उधारी वसूल होऊ शकते नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.

तुळ : आज आपले मनोबल चांगले असणार आहे. दूरचे प्रवास होऊ शकतात पण प्रवास टाळलेले बरे . काढून त्यातून फायदा होणार नाही. आजचा दिवस आपणास मिश्र घटनांचा असणार आहे.

वृश्चिक : आजचा दिवस आपणास फार समाधानकारक जाणार नाही. अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. जे प्रयत्न कराल त्याच्यामध्ये हवे तसे यश मिळेल याची शक्यता कमी आहे.

धनु : आजचा दिवस आपणास विविध प्रकारे अनुकूल जाणार आहे. आजूबाजूचे वातावरण खूप चांगले असणार आहे. समस्या आल्या तरी त्या सहज सोडवाल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळेल.

मकर : आपल्याला आपल्या व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. आपल्यासाठी आजचा दिवस आनंदी जाणार आहे. व्यवसाय मध्ये चांगली प्रगती होईल. नोकरीमध्ये अनुकूलता राहणार आहे.

कुंभ : आपण नोकरी करत असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात उत्साही आणि आनंदाने होणार आहे. आर्थिक वाढीची शक्यता आहे. नवीन उपक्रम सुरू करण्याची शक्यता आहे.

मीन : नवीन गुंतवणुकीचा विचार असेल तर आज तो धोका पत्करू नका. नवीन अडचणी समोर येतील.नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कुरबुरी होण्याची शक्यता आहे.

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच