मेष - काही कामानिमित्त जवळपासचा प्रवास होण्याची शक्यता नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील व्यवसायात उलाढाल पाडून विक्री चांगली होईल.आरोग्य चांगले राहील.
वृषभ - अनेकानेक मार्गांनी लाभाची शक्यता. नोकरी व्यवसायातील परिस्थिती सकारात्मक राहील काही फायद्याचे सौदे हाती येतील. मानसन्मान मिळेल.
मिथुन - अवतीभवती सकारात्मक घटना घडल्यामुळे अनुकुल होते मध्ये वृद्धी होऊन मनावरचा ताण तणाव नाहीसा होईल महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
कर्क - नोकरी अथवा व्यवसाय निमित्त प्रवास करावा लागेल महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे थोडा संयम व सबुरी ठेवा.
सिंह - आर्थिक दृष्ट्या उत्कृष्ट दिवस व्यवसाय धंद्यात मोठे फायदे होतील नवीन करारमदार होऊ शकतात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल.
कन्या - रोजचे दैनंदिन कामांमध्ये आर्थिक नियोजन करावे लागेल. व्यवसायात विक्रीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत काही सकारात्मक बदलाची शक्यता.
तुळ - भाग्याची साथ राहील दूरच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते महत्त्वाच्या गाठीभेटी होतील महत्त्वाच्या कामांना गती मिळेल आर्थिक आवक मनासारखी राहिल.
वृश्चिक - आर्थिक आवक स्थिर राहील काही महत्त्वाची कामे पुढे ढकलली जाण्याची शक्यता स्वभावात चिडखोरपणा येऊ शकतो कच राग दुसर्यावर काढू नका. संयम ठेवणे आवश्यक ठरेल.
धनु - आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील नवीन संधी मिळू शकतात त्या संधीचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ घालवू नये.
मकर - रोजची कामे विनाविलंब होतील मात्र काही महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक अडचणी उद्भवू शकतात आरोग्याची काळजी घ्या दगदग होईल अशी कामे करू नका.
कुंभ - व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील काही महत्त्वाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरेल काही अप्रिय निर्णय सुद्धा घेण्याची तयारी ठेवा.
मीन - रोजच्या कामाव्यतिरिक्त काही अतिरिक्त कामे करावी लागतील वेळ कमी पडेल वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल तसेच इतरांचे साहाय्य घ्यावे लागण्याची शक्यता. मदत मिळेल.