मेष - कुटुंबातील व्यक्तींची सामंजस्याने वागण्याची गरज राहील वादविवाद टाळा शांततेने निर्णय घ्यावे लागतील. एका वेळेस एकच काम करा. त्यामध्ये यश लाभेल.
वृषभ - रोजच्या हातातील कामांना गती मिळून पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळेल विद्यार्थ्यांना उत्तम काळ आहे. अपेक्षित यश साध्य होईल. कौटुंबिक सुख लाभेल.
मिथुन - आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होऊन नवीन कार्यक्रमाचे आयोजन होईल. त्यांच्यासमवेत दिवस आनंदात व उत्साहात जाईल. जवळचे प्रवास घडतील.
कर्क - अवघड वाटणारी कामे सहज पूर्ण करू शकाल आपल्या कर्तृत्वावर अति विश्वास ठेवा. मित्रमंडळींच्या वर्तुळातून तसेच कुटुंबातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल.
सिंह - व्यवसाय धंद्यात प्रगती होऊन उलाढाल वाढेल त्याचबरोबर नफ्याचे प्रमाणही वाढेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडू शकतो. इतरांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल.
कन्या - छोटे प्रवास घडतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीगाठी होऊन दिवस आनंदात जाईल सामाजिक कार्यात रस घ्याल. वादविवाद टाळा.
तुळ - आर्थिक चिंता सुटतील अपेक्षित येणी आल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. घरातील मुला मुलींकडून सुखद वार्ता मिळतील.
वृश्चिक - सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात रहा. आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच अतिविचार करणे टाळा. वाहने चालवताना सतर्क राहा.
धनु - जुने मित्रमंडळी भेटतील त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी उभ्या राहू शकतात. कुटुंबामध्ये इतरांच्या मताला प्राधान्य देऊन वादविवाद टाळा.
मकर - दिवसातील बराचसा वेळ कुटुंबासाठी द्याल सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्यायला कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटल्यामुळे आनंदी राहाल.
कुंभ - व्यवसाय धंदा यामधील नियोजन सफल झाल्याने नवीन बदल घडवून आणू शकाल. उलाढाल वाढेल. नवीन संकल्पना वापरू शकाल. कुटुंबात समाधानकारक परिस्थिती राहील.
मीन - प्रेमात यश लाभेल. परंतु अतिआत्मविश्वास टाळा गैरसमज होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यातील महत्त्वाची कामे होतील. नवीन उपक्रम राबवू शकाल. जुने मित्र भेटतील.