आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 12, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपले मन अस्वस्थ्य असणार आहे.जास्त विचार करू नका मनावर उगाच स्थान येणार आहे. शांतपणे व मन स्थिर करून कामे करा. कामावर लक्ष केंद्रित करणे फार आवश्यक आहे.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात विस्तार करण्यासाठी आपले चांगले नियोजन असणार आहे. भागीदार आपणास चांगले सहकार्य देणार आहे.नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात.

मिथुन - नोकरी च्या ठिकाणी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. म्हणून. मन शांत ठेवून काम करणे आवश्यक आहे. कामामध्ये आपणास सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

कर्क - कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल. आपणास चांगली प्रसिद्धी मिळणार आहे. कामकाजात प्रगती होणार आहे. आर्थिक लाभ चांगले होतील.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपले काम चांगले होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील. भावंडांचे नाते संबंध चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे.

कन्या - प्रवास होण्याची शक्यता आहे.आपला व्यवसाय परदेशात असेल तर त्यामध्ये चांगली प्रगती होणार आहे. प्रगतीच्या चांगल्या बातम्या समजतील. आर्थिक बाजू चांगली असणार आहे.

तुळ - आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यापार व्यवसायामध्ये खेळते भांडवल लागत होते त्याची चण चण भासत होती. ती आज भासणार नाही. घरातूनच आपल्याला सहकार्य मिळणार आहे.

वृश्चिक - काहीजणांना कामांमध्ये ताण निर्माण होणार आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. दैनंदिन कामे सुरळीत होणार आहेत.

धनु - आज आपली विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला थकवा येण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करूनच काम करा .आर्थिक व्यवहार सांभाळून करावे.

मकर - नोकरी व्यवसायामध्ये आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत. कामांमध्ये प्रगती होणार आहे .मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनकरण्याकडे लक्ष राहणार आहे.

कुंभ - गुरुकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.आपल्या आरोग्य चांगले असेल. धार्मिक प्रवास होऊ शकतो. हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे.

मीन -आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.वारसा हक्काच्या कामांमध्ये प्रगती होणार आहे.जोडीदाराकडून आर्थिक सहकार्य लाभणार आहे.खिसा पाकीट सांभाळा.

Pune : शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एकावर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सपासप वार करून हल्लेखोर फरार

'तुझ्यासोबत माझाही नवा जन्म झाला'; लेकाच्या वाढदिवशी जिनिलीयाची भावुक पोस्ट, रितेशकडूनही रियानला खास शुभेच्छा

Naigaon : आईच्या निधनाचं दुःख ताजं असतानाच आणखी एक आघात; खेळताना ११ व्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीच्या पाण्यात सापडल्या अळ्या; स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर; रहिवाशी संतप्त

Thane : रिक्षा बंदवरून संघटनांमध्येच जुंपली; एकाचा बेमुदत बंदचा इशारा, दुसऱ्याचा मात्र संपाला विरोध