आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,१३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 13, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : आज आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी भासणार आहे. त्याचे कारण स्वतःचे प्रकृती अस्वास्थ्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामामध्ये विनाकारण अडचणी येण्याची शक्यता आहे.

वृषभ : जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आर्थिक आवक सामान्य राहील. आज मन मात्र आनंदी असणार आहे. संतती बरोबर चांगला संवाद साधणारा आहात. त्यांची प्रगती होणार आहे .

मिथुन : अनेक चिंता दूर होतील. कोणाचातरी आर्थिक आधार मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती ची कामे होतील. आपल्या बोलण्यावर आपले नियंत्रण असावे.

कर्क : व्यापार व्यवसायात चांगली स्थिती रहाणार आहे. नोकरीत अनपेक्षित संधी येणार आहे .प्रवासाचे योग आहेत. चांगले खाणे पिणे नीट ठेवणे आवश्यक आहे. दगदग होण्याची शक्यता.

सिंह : कौटुंबिक सुख यामध्ये वाढ होणार आहे.मात्र हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जुनी येणी वसूल होतील.एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे काम मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : मनाला उत्साह व आनंद मिळणारे वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे आपल्या मनाची मरगळ दूर होईल.नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्येनिर्णय योग्य ते घ्या या..

तुळ : आपल्याला अनेक कामे असणार आहे. एखाद्याचे काम घ्याल ते पूर्ण करा.व्यवसायाचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रवासाचे योग आहेत.

वृश्चिक : महत्वाच्या बातम्या समजतील. व्यापार वाढीसाठी आपणास नवीन संधी येणार आहे. आपणास काही कठीण कामाला सामोरे जावे लागणार आहे, त्यामध्ये कोणाचे तरी सहाय्य मिळेल.

धनु : नोकरीमध्ये आपल्या मताला प्राधान्य मिळाल्यामुळे आपण आनंदी राहाल.महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल त्यामध्ये आलेल्या अडचणी विचारपूर्वक सोडवाल.

मकर : व्यापार व्यवसायातल्या अडचणी दूर होणार आहेत.महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करा . सामाजिक क्षेत्रामध्ये काम कराल. त्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.

कुंभ : खूप काम असणार आहे. खूप धावपळ आणि दगदग करू नका. स्वतःच्या प्रकृतीचे ही भान असू द्या. एका वेळी अनेक कामे करू नका. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे .

मीन : देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होणार आहेत.नोकरीमध्ये धावा धाव कमी होणार आहे. इतरांच्या कामात दखल देऊ नका. व्यापार व्यवसायात विक्री चांगली होईल,नफ्याचे प्रमाण चांगले राहणार आहे.

व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध

सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ

पावसाळ्यात आवर्जून खा करटोलीची भाजी; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Monsoon Makeup Tips : पावसातही मेकअप राहील परफेक्ट; लक्षात ठेवा 'या' ७ गोष्टी

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार