आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १३ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 13, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज आपल्यामध्येआत्मविश्वासाची कमी भासणार आहे. त्याचे कारण स्वतःचेप्रकृती अस्वास्थ्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामामध्ये विनाकारण अडचणी येण्याची शक्यता आहे.

वृषभ - जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आर्थिक आवक सामान्य राहील. आज मन मात्र आनंदी असणार आहे. संतती बरोबर चांगला संवाद साधणारा आहात. त्यांची प्रगती होणार आहे .

मिथुन - अनेक चिंता दूर होतील. कोणाचातरी आर्थिक आधार मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती ची कामे होतील. आपल्या बोलण्यावर आपले नियंत्रण असावे.

कर्क - व्यापार व्यवसायात चांगली स्थिती रहाणार आहे. नोकरीत अनपेक्षित संधी येणार आहे. प्रवासाचे योग आहेत. चांगले खाणे पिणे नीट ठेवणे आवश्यक आहे. दगदग होण्याची शक्यता.

सिंह - कौटुंबिक सुख यामध्ये वाढ होणार आहे. मात्र हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जुनी येणी वसूल होतील. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे काम मिळण्याची शक्यता आहे.

कन्या - मनाला उत्साह व आनंद मिळणारे वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे आपल्या मनाची मरगळ दूर होईल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्येनिर्णय योग्य ते घ्या या.

तुळ - आपल्याला अनेक कामे असणार आहे. एखाद्याचे काम घ्याल ते पूर्ण करा.व्यवसायाचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रवासाचे योग आहेत.

वृश्चिक - व्यापार व्यवसायाच्या वाढीसाठी आपणास नवीन संधी येणार आहे. आपणास काही कठीण कामाला सामोरे जावे लागणार आहे, त्यामध्ये आपणाला कोणाचे तरी सहाय्य मिळेल.

धनु - नोकरीमध्ये आपल्या मताला प्राधान्य मिळाल्यामुळे आपण आनंदी राहाल. महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल त्यामध्ये आलेल्या अडचणी विचारपूर्वक सोडवाल.

मकर - व्यापार व्यवसायातल्या अडचणी दूर होणार आहेत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करा. सामाजिक क्षेत्रामध्ये काम कराल. त्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.

कुंभ - खूप काम असणार आहे. खूप धावपळ आणि दगदग करू नका. स्वतःच्या प्रकृतीचे ही भान असू द्या. एका वेळी अनेक कामे करू नका. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

मीन - देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होणार आहेत. इतरांच्या कामात दखल देऊ नका. व्यापार व्यवसायात विक्री चांगली होईल,नफ्याचे प्रमाण चांगले राहणार आहे.

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष