मेष - स्वतःचा वैयक्तिक सुसंवाद यांने नाते संबंधमधील सुधारणा होतील. तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल.
वृषभ - नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत रहाल. आपली स्थिती समाधान कारक राहणार आहे. नोकरीमध्ये काम आपणास जास्त असणार आहे. आपणास सहकार्य मिळाल्याने त्याचा ताण वाटणार नाही.
मिथुन - नोकरी व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील. आपण त्याप्रमाणे कामाची दिशा बदलाल, त्याचे फायदे आपणास होणार आहेत. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.
कर्क- आज आपल्या मध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपल्याला स्वतःसाठी काम करायचे आहे याची जाणीव होणार आहे. त्यामुळे व्यक्तिगत कामांकडे लक्ष द्याल.
सिंह - आज अनेकांशी सुसंवाद होतील. प्रियजनांच्या ख्यालीखुशाली चे फोन होतील. त्यामुळे आपण आनंदी राहणार आहात. जुन्या आठवणी गुंतून जाल. छोटासा प्रवास होऊ शकतो.
कन्या - गृह सौख्यात वाढ होणार आहे. आवडते पदार्थ खावयास मिळतील. नोकरी व्यवसायातील बदल आपणासाठी अनुकूल असणार आहेत. बदलाला आनंदाने सामोरे जा.
तुळ - आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर झाल्यामुळे आपणास मनःशांती लाभणार आहे. जास्तीच्या जबाबदारीचेही नियोजन होणार आहे. आपल्या मनावरचे ओझे कमी झाल्यामुळे आनंदी राहाल.
वृश्चिक - घरातील जुने वाद संपुष्टात येतील. आपणास उत्तम लोकांची संगत लाभणारा आहे. घरातील छोट्या कार्यक्रमात मन रमवाल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.
धनु - अडथळ्यांची शर्यत संपणार आहे. केलेल्या कामाचे श्रेय मिळणार आहे. कामात महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आपणास समाधान मिळणार आहे.
मकर - नोकरीमध्ये कामातील अडचणी आधीच समजून घ्या. त्याप्रमाणे काम करा, महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. सरकारी कामे होतील.
कुंभ - नोकरीत प्रगती होणार आहे आहे. काही धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी होणार आहात. व्यापार व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित असे ठोस उपाय करण्याची योजना असेल.
मीन - लहान सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका. सकारात्मक विचाराने कामाला चालना मिळणार आहे. जोडीदाराकडून आपणास सहकार्य मिळणार आहे.