आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १६ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 16, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्याला सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आजचा दिवस प्रयत्नांती परमेश्वर आहे. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कसूर करू नका. आर्थिक लाभ होतील.

वृषभ - आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीत फायदे होणार आहे. नोकरीतील बदल आपल्याला फायद्याचे ठरणार आहेत.

मिथुन - स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. नोकरीमध्ये चांगला कालावधी असेल. सहज सुरळीत कामे होणार आहेत.

कर्क -आपल्या मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे. कार्य क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत कराल. त्यांच्या यशाने घरातील वातावरण सुखमय होणार आहे.

सिंह - जमीन-जुमला ची कामे मनासारखी होणार आहेत. भावंडांच्या गाठी भेटी होऊ शकतात. ग्रह ते चांगले मिळणार आहे. नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.

कन्या -आज आपण कामकाजात मग्न राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बौद्धिक विचाराने आणि सहकार्याने काम करून यश मिळवा.

तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिलास खरा आनंद उपभोगता येणार आहे. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतीही समस्या हुशारीने व समजूतदारपणे सोडवा.

वृश्चिक -आपल्यासमोर एका वेळेला अनेक कामे दिसणार आहे. तरीसुद्धा एका वेळेस एकच काम करावे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. मनोबल वाढवा.

धनु - मनावर अनामिक दडपण राहणार आहे. काही महत्त्वाची कामे लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आपल्या मनावर थोडे ओझे वाटणार आहे. मनःशांतीसाठी उपायोजना करा.

मकर - आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे. आपणास खरे समाधान मिळणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दिवस आहे.

कुंभ - नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे कामांचे अर्ज करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे कामाचा उत्साह वाढणार आहे.

मीन - आज आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला दिवस राहणार आहे. लोकांच्या मागे उभे राहून त्यांना मदत कराल. आपली चिडचिड पण कमी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

CET गैरप्रकार रोखण्यास नवे नियम; परीक्षेदरम्यान बोलल्यास होणार शिक्षा; AI टूल्स व डिजिटल साधनांनाही प्रतिबंध

ठाणे मनपात विविध समितीतील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

Mumbai : सेंट्रल पार्कच्या खुल्या जागेचे व्यावसायिकीकरण होणार नाही; सरकारचे सभागृहात आश्वासन