आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १७ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 17, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपली कामातील जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. पैसे उसने देताना विचार करून द्या.आरोग्याची काळजी घेणे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.उगाच काळजी करू नका.

वृषभ - व्यापार-व्यवसायात जोखीम पत्करू नका. आज खरेदी होईल. हातून दानधर्म पण होणार आहे. नोकरीत प्रगती होणार आहे. पगारवाढ मिळण्याची शक्यता. तब्येतीकडे लक्ष द्या.

मिथुन - मन शांत ठेवणे आवश्यक आहे.आर्थिक आवक चांगली राहणार आहे. समाज सेवा करण्यासाठी वेळ द्याल. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन मग समाजसेवा करा.

कर्क - व्यवसायामध्ये चांगला जम बसणार आहे. कुटुंबातील वातावरण समाधान कारक असणार आहे. घरातून आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळणार आहे.

सिंह - आपल्या बहीण-भावांचे संबंध मधुर राहणार आहे. त्यांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस आपणास द्यावा लागणार आहे.आपल्याविषयी त्यांच्या मनात आदर वाढणार आहे.

कन्या -आपणास विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे पण खर्चही त्या प्रमाणात वाढते जमाखर्चाचे अंदाजपत्रक विस्कळीत होऊन देऊ नका का ग्रह व त्यात वाढ होणार आहे.

तुळ - खाजगी क्षेत्रातील नोकरी करणार्‍या व्यक्तींना शुभवार्ता समजेल. नवीन नवीन योजना कार्यान्वित करण्याचा विचार असेल. पण सर्व प्रकारची दक्षता घेणे चांगले.

वृश्चिक - कोणतेही काम करताना घाईगडबडीने करू नका. नियम अटी पाळल्या जात आहेत की नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.

धनु - जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आवक चांगली राहणार आहे. कामामध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यास सहकाऱ्यांचा सल्ला घेणे, आपल्यासाठी फायदेशीर आहे.

मकर - नवीन योजना अमलात आणण्याचा विचार करणार आहात, तत्पूर्वी वरिष्ठांचा विचार करणे आवश्यक आहे. रखडलेली कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.

कुंभ - नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असेल.सामाजिक आणि धार्मिक काम काम हातून घडेल दान धर्म होण्याची शक्यता आहे.

मीन - कोणालाही पैसे उसने देताना विचारपूर्वक द्या. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्यावर लक्ष असू द्या. आर्थिक आवक चांगली असणार आहे. मनावरचा ताण कमी होईल.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद