आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील.

वृषभ - व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. भागीदाराचे सहयोग मिळेलच, त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील. कामे पूर्ण होतील.

मिथुन - तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा. उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील.

कर्क - आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे.

सिंह - प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मालमत्तेसंबंधी जे काही प्रश्न आहेत ते सर्वांनी मिळून सोडवावे लागणार आहे.

कन्या - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमचे कौतुक पण होईल. आनंदित राहाल. आज कोणत्याही प्रकारचा ताण असणार नाही.

तुळ - घरातील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुमचे चांगले नियोजन होईल.

वृश्चिक - तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे. चांगल्या संधी येणार आहे, संधीचे चांगले सोने कराल. व्यवसाय वृद्धी चे प्रयत्न चांगले होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

धनु - व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. घरामध्ये जास्त वाद-विवाद नको. व्यापार व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे. तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरणार आहे.

मकर - जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता. त्यासाठी मित्र व सहकारी यांचे सहकार्य घ्याल आर्थिक चणचण कमी होईल, त्यामुळे समाधानी राहील. खर्चही कराल.

कुंभ - कामाचा उत्साह राहणार आहे. बुद्धी कौशल्याने कामे करून घ्याल. लोकांची मने जिंकाल. सामाजिक कार्य व लोकशिक्षणाचे कार्य यामध्ये सहभागी व्हाल.

मीन - कामामध्ये लक्ष केंद्रित असेल, त्यामुळे कामे चांगली होतील. मोठे निर्णय घ्याल ते बरोबर ठरतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सहाय्य लाभणार आहे.

भाकरी असो वा पुरी, भरलेली शिमला मिरची लागेल अप्रतिम; पाहा सोपी रेसिपी

'मल्याळम सिनेमात पदार्पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवा लूक चर्चेत फोटो पाहिलेत का?

गरबा झाला, फोटोही काढले... आता ड्रेस परत? रिटर्न पार्सलचा ढीग पाहून नेटकरीही चक्रावले; VIDEO व्हायरल

Dussehra 2026 : पदरावर कमळाची नक्षी अन् रंगांची आकर्षक उधळण; लोटस पैठणीने खुलवा सणासुदीचं सौंदर्य

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका