आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली जुनी येणी वसूल होतील. आजूबाजूला अनुकूलता भरून राहिल्याने उत्साह आणि उमेद वाढेल.

वृषभ - महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या मित्रमंडळींचा तसेच समाजातील मान्यवरांची मदत आणि मार्गदर्शन मिळेल.

मिथुन - काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटू शकतात पण जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे हे कार्यमग्न रहा. स्वतःची कामे स्वतः करा. अर्थप्राप्ती होईल.

कर्क - नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकार्‍यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल काही महत्त्वाचे बदल घडू शकतात ते बदल आपल्याला फायदेशीर ठरतील आर्थिक लाभ होतील.

सिंह - समाजातील सन्माननीय व मान्यवरांच्या ओळखी होतील लोक संग्रहामध्ये वाढ होईल. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषविता येईल. अर्थप्राप्ती बरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळेल.

कन्या - आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात प्रकृतीकडे लक्ष द्या. शत्रु हितशत्रूंच्या कारवाया मध्ये वाढ होऊ शकते. परंतु त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कार्यात मग्न रहा.

तुळ - नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. एखादी विशेष महत्त्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. लहान मोठे प्रवास सुद्धा करावे लागतील.

वृश्चिक - खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल अनावश्यक खर्च नको. व्यापार-व्यवसायात अचानक काही खर्चिक बाबी पुढे येतील. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल. मनसोक्त खर्च कराल.

धनु - वर्तमानात असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारेल शासकीय स्वरूपाची कामे पूर्ण होतील ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल.

मकर - स्थायी संपत्ती अथवा जमीन-जुमला याबद्दलची कार्ये गतिशील होतील वडिलोपार्जित संपत्ती विषयक असलेले वाद मिटू शकतात. सरकारी कामे होतील मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ - दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण झाल्याने ती कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. कौटुंबिक सुख मिळेल.

मीन - आर्थिक परिस्थिती सुधारेल जुन्या गुंतवणुका लाभ देतील नवीन गुंतवणूक करण्याआधी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा विचार विमर्श घेणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

कैरीचं लोणचं नाही, यावेळी बनवा आंबट-गोड 'कैरी जाम'; ब्रेड-पोळीसोबत लागेल भन्नाट

ICSE चा दहावी, बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO