आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी संधी येणार आहे. आपण आपले काम नियोजन पूर्व व सातत्याने करणार आहात. काम चांगले झाल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राहणार आहे.

वृषभ - व्यापार व्यवसाय मध्ये चांगले निर्णय घेणारा आहात. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने आपल्याला मानसिक समाधान लाभणार आहे.

मिथुन - इच्छा नसताना काही कामे करावी लागणार आहेत. मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसताना जास्त विचार करू नका.

कर्क - आजच्या तुमच्या आनंदे वृत्तीमुळे कामाचा वेग वाढणार आहे. आवडत्या कामामध्ये काम करावयास मिळणार आहे. जोडीदाराचे आपल्याला सर्व प्रकारे साहाय्य लाभणार आहे.

सिंह - एखाद्या धुर्त व्यक्ती चा सामना करावा लागणार आहे. तुमची हुशारी पणाला लागणार आहे. नोकरी मध्ये समाधानकारक स्थिती असणार आहे. शत्रु काढण्याचा प्रयत्न करेल.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात आपले निर्णय चांगली होणार आहेत. ऊर्जेची पातळी चांगली असणार आहे. मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे.

तुळ - आज शांततेत दिवस घालवण्याचा तुमचा मानस असणार आहे. जास्त धावपळ आणि दगदग नको वाटेल. कुटुंबासमवेत आनंद साजरा कराल.

वृश्चिक - नवीन कामासाठी परदेशातून शुभ संदेश देऊ शकतात. आपले निर्णय योग्य आहेत की नाही ते तपासा. बहिण भाऊ यापैकी कोणाला तरी आर्थिक मदत लागू शकते.

धनु - आज स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. स्वतःसाठी मनन चिंतन करणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

मकर - आपला कंटाळा जाणार आहे. आजच्या दिवसाची इच्छा वाढणार आहे. सहकार यांच्या संवादातून वेळेचा सदुपयोग होणार आहे.

कुंभ - देणे घेण्याचे व्यवहार चांगले सांभाळून केले पाहिजे. समोरच्या व्यक्तीसाठी विनाकारण खर्च करताना विचार करणे आवश्यक आहे. काही कामांसाठी प्रवास करण्याची शक्यता आहे .

मीन - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने आपण आनंदी असणार आहात. आजच्या दिवशी आपणास जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. संवाद साधणार आहात.

रेवडी संस्कृतीवर ताशेरे; राज्य तोट्यात, तरीही खिरापत का वाटता? रोजगार निर्मितीवर भर द्या! सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना फटकारले

एप्रिलपासून २२ राज्यांत SIRची अंतिम प्रक्रिया; निवडणूक आयोगाचे निर्देश

‘डीपफेक’ रोखण्यासाठी AI कंटेंटवर लेबल असावे; पंतप्रधान मोदी यांचे मत

Mumbai : सव्वा वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचा महापौर? मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलणार; महायुतीत एकमत झाल्याची चर्चा

एपस्टीन प्रकरणात ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्रयू यांना अटक