आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,२० जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : मनोरंजनाकडे कल राहून मित्रमंडळींच्या समवेत दिवस मजेत जाईल. व्यसनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुसंगती टाळा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

वृषभ : कुटुंबीयांसमवेत प्रवासाचे नियोजन करू शकाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. अनेकानेक मार्गाने धन आगमनाची शक्यता.

मिथुन : महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिवस आनंदात जाईल नव्या ओळखी होतील. मात्र आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज.कोणाच्या वादविवादात पडू नका.

कर्क : समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभून मार्गदर्शन मिळेल.जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल.

सिंह : मानसन्मानाची वृद्धी होईल. नोकरीत अधिकार वाढतील. आपले मत महत्त्वाच्या कामात विचारात घेतली जाईल. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील

कन्या : कार्यस्थळी व्यवसायात इतरांची मदत मिळाल्यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.

तुळ : कुटुंबातील मोठ्या लोकांचा आशीर्वाद लाभून त्यांच्याकडून मदत तसेच मार्गदर्शन मिळेल.व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नोकरीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये तसेच अधिकारात ही वाढ होईल. आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता.

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावी त्याचप्रमाणे प्रवासही टाळावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा इतरांच्या मतास प्राधान्य द्या.व्यवसायिक परिस्थिती समाधान कारक राहील.

मकर : इतरांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व बोलण्याचा प्रभाव पडेल. प्रलंबित कामे होऊ शकतात आळस करू नका आजचे काम उद्यावर ढकलू नका.

कुंभ : बऱ्याच दिवसांनी जुने मित्रमंडळी भेटतील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आठवणीत रमून जाईल. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.

मीन : आपण घेतलेले महत्त्वाचे निर्णय अचूक ठरून त्याचा फायदा होईल कौटुंबिक सौख्य लाभेल मुलांकडून शुभवार्ता मिळतील. दिवस चांगला जाईल.

केवळ कठोर शिक्षेने अत्याचार थांबणार कसे?

वीकेंड पार्टीसाठी बनवा झणझणीत पनीर शेजवान ब्रेड रोल; मुलांनाही आवडेल हा चविष्ट स्नॅक

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

शिक्षकांना अध्यापनासाठी मिळणार अधिक वेळ; माहितीचा वार शनिवार निश्चित

Mumbai : यकृत, मधुमेहावर प्रभावी उपचारांचा नवा मार्ग मोकळा; ‘आयआयटी बॉम्बे’च्या संशोधनातून यश