आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २२ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कोणावरही अवलंबून न राहता आपली वाटचाल आपण करा. व्यापार-व्यवसायात व्यवस्थेचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. आर्थिक फायदे मिळतील.

वृषभ - शक्ती पेक्षा युक्ति ने मार्ग काढाल. ते तुमच्याच फायद्याचे आहे. नोकरदारांनी आपल्या अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नये. मित्र मंडळी वर जास्त विसंबून राहू नका. लाभ मिळतील.

मिथुन - कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास मिळालेल्या संधीचे सोने करा. लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत. भाग्याची साथ मिळणार आहे.

कर्क - गृहकलह फारच क्लेशदायक असतात याचा प्रत्यय आपल्याला येणार आहे. कामानिमित्त होणाऱ्या प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील.

सिंह -आपल्या कार्यक्षेत्रात आपण कर्तबगारीचा ठसा उमटवणार आहात. विरोधकांना न दुखावता त्यांना खडे बोल सुनावले तर सरशी तुमचीच आहे. दिवस आपणास सुखावह जाणार आहे.

कन्या -आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य यावर अधिक लक्ष देणे जरुरी आहे. प्रलोभनांपासून सावध राहणे. महिलांनी आहार व्यवहाराची बंधने पाळावी.

तुळ - आपल्या कामाची घोडदौड वेगाने होत राहणार आहे. आपला आत्मविश्वास आपल्या क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे.

वृश्चिक - दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वकर्तृत्वावर अधिक भर दिला तर सरशी तुमचीच आहे. महत्त्वाची कामे पार पडतील. संवादातून आर्थिक प्रगती साधता येईल.

धनु - कुणी कुणाचा कायमचा नसतो हे जाणून वागलात तर मनस्ताप होणार नाही. नातेवाईकांचे वागणे खटकले तरी लगेच त्यावर टोकाची प्रतिक्रिया देऊ नका.

मकर - नात्यातील प्रेमळ धागा जपला तर फायदा तुमचाच आहे. गोड बोलून कामे करून घ्या. आर्थिक नियोजन चांगले असणार आहे. आर्थिक फायदे होणार आहेत.

कुंभ - मानसिक अशांतता दूर झाल्याने प्रसन्ना असणार आहात. नवीन कामाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. आपल्या समोर संधी दिसणार आहेत.

मीन - पेराल तेच उगवणार आहे. शब्दाने शब्द वाढवू नका. विरोधकांच्या हाती आपली महत्त्वाची माहिती जाणार नाही याची खबरदारी घ्या.जमतील तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.

रोजची पोळी खाऊन कंटाळलात? भाज्यांपासून बनवा पौष्टिक व्हेजिटेबल रोटी

रात्रीच्या जेवणासाठी झटपट आणि चविष्ट भाजी हवी? बनवा शेंगदाण्याच्या सारणाची भरली शिमला मिरची

सणवारांना नटताना स्किनटोननुसार कपड्यांची निवड कशी कराल? जाणून घ्या

ललित-प्राजक्ताची 'रेशीमगाठ' पुन्हा जुळणार; नव्या फोटोंनी वेधलं लक्ष!

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन