मेष - कोणावरही अवलंबून न राहता वाटचाल करा. व्यापार-व्यवसायात व्यवस्थेचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. आपले दैनंदिन वेळापत्रक नियोजनपूर्वक आखल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील.
वृषभ - शक्ती पेक्षा युक्ति ने मार्ग काढाल. ते तुमच्याच फायद्याचे आहे. नोकरदारांनी अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नये. मित्र मंडळी | वर जास्त विसंबून राहू नका. आर्थिक उलाढाली चांगल्या होतील.
मिथुन - कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास मिळालेल्या संधीचे सोने करा. लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत. भाग्याची साथ मिळेल प्रवासाची शक्यता धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात.
कर्क - गृहकलह फारच क्लेशदायक असतात याचा प्रत्यय आपल्याला येणार आहे. कामानिमित्त होणाऱ्या प्रवासात त्रास संभवतो. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागणार आहे.
सिंह - कार्यक्षेत्रात कर्तबगारीचा ठसा उमटवणार आहात. विरोधकांना न दुखावता त्यांना खडे बोल सुनावले तर सरशी तुमचीच आहे. दिवस सुखावह जाणार आहे. फायदे होणार आहेत.
कन्या - आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य यावर अधिक लक्ष देणे जरुरी आहे. प्रलोभनांपासून सावध राहणे. महिलांनी आहार व्यवहाराची बंधने पाळावी. स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुळ - आपल्या कामाची घोडदौड वेगाने होत राहणार आहे. आपला आत्मविश्वास आपल्या क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे.
वृश्चिक - दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वकर्तृत्वावर अधिक भर दिला तर सरशी तुमचीच आहे. महत्त्वाची कामे पार पडतील. | संवादातून आर्थिक प्रगती साधता येईल.
धनु- कुणी कुणाचा कायमचा नसतो हे जाणून वागलात तर मनस्ताप होणार नाही. नातेवाईकांचे वागणे खटकले तरी लगेच त्यावर टोकाची प्रतिक्रिया देऊ नका.
मकर - नात्यातील प्रेमळ धागा जपला तर फायदा तुमचाच आहे. गोड बोलून कामे करून घ्या. आर्थिक नियोजन चांगले असणार आहे. आर्थिक फायदे होणार आहेत.
कुंभ - मानसिक अशांतता दूर झाल्याने प्रसन्ना असणार आहात. नवीन कामाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला जाणार आहे.
मीन - पेराल तेच उगवणार आहे. शब्दाने शब्द वाढवू नका. विरोधकांच्या हाती आपली महत्त्वाची माहिती जाणार नाही याची खबरदारी घ्या. जमतील तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.