आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा असणार आहे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे आपणास सहकार्य लाभणार आहे.

वृषभ - नोकरीमध्ये उत्तम परिस्थिती असेल. बौद्धिक व वैचारिक प्रगती होणार आहे. व्यापार व्यवसायात नवीन प्रस्ताव समोर येतील. आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे.

मिथुन - आजचा दिवस आपला चांगला असणार आहे. हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे.

कर्क - उपद्व्यापी व्यक्तींना खराब दिवस जाणार आहे. ओळखीतून विशिष्ट लाभ होईल. काही व्यवहारात त्रास होऊ शकतो. कुठल्याही प्रकारे नकारात्मक विचार नकोत.

सिंह - शुभ ग्रहांचा अनुष्ठान राहणार आहे. उत्तम लाभ होणार आहेत. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. आपल्या विषयी काही व्यक्तींचा गैरसमज होऊ नये.

कन्या - नोकरी-व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर चांगला कालावधी आहे. सुवार्ता मिळतील.. मुलाखती यशस्वी होतील. परदेशी असणार्‍या व्यक्तींचे भाग्यदय होणार आहेत.

तुळ -शुभ ग्रहांची साथ असल्यामुळे तरुणांना उत्तम लाभ होणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. घरातील व्यक्तीने एकमेकांची मना सांभाळावीत.

वृश्चिक - आपले सामाजिक जीवन जपा. कोणालाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दुखावू नका. राजकारणी व्यक्तींनी घरी आणि दारी सांभाळावे. गुंतवणूकीतून लाभ होतील. दैवी प्रचिती येईल.

धनु - आजच्या दिवसात काहीतरी चांगले घडणार आहे. उत्तम लाभ होतील. शैक्षणिक दृष्ट्या भाग्योदयाचा आहे. नोकरीच्या ठिकाणी मनासारख्या जागी काम करण्याची संधी मिळणार आहे.

मकर - जोडीदाराची उत्तम साथ राहील. मात्र छोट्या मोठ्या कारणावरून वाद घालू नका. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसाय फार मोठे धाडस करु नका. आपले अंदाज चुकू शकतात.

कुंभ -आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर झाल्यामुळे आपण आनंदित राहाल. काम करण्याचा उत्साह वाढणार आहे. नवीन कामे समोर येतील. धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.

मीन - थोडी हुरहुर आणि काळजी वाटण्याचा दिवस आहे. आपल्याला आपला जोडीदार संभाळून घेणार आहे. काही कारणाने आपल्या मनावर थोडा ताण राहणार आहे.

महायुतीत खदखद; सातारा जि.प. निवडणुकीवरून विधिमंडळात घमासान

संकटातही राजकारणाची 'काँग्रेसी' मनोवृत्ती

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मूग वडे; सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक