आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २५ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 25, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजचा दिवस फारसा आपणास अनुकूल नाही. आपण आपल्या जीवनाकडे फार सकारात्मक दृष्टीने बघणार नाही. कोणत्याही क्षेत्रात नुसते अंदाजावरून काम करू नका.

वृषभ - आजचा दिवस आपणास आनंदाचा आहे मैत्रीचे संबंध वाढणार आहेत अनेकांना आपला सहवास हवाहवासा वाटणार आहे. वाक चातुर्याने आपण आपली कार्यसिद्धी करून घेणार आहात.

मिथुन - आपला स्वभाव जुळून घेण्याचा आहे. समोरच्याकडून आपल्याला काय फायदा आहे याचे आकलन आपल्याला निश्चितच चांगले होते.

कर्क - आपली निर्णय घेण्याची क्षमता आणि तारतम भाव जाणण्याची क्षमता अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम निर्णय होणार आहेत.

सिंह - आज आपल्याला आपला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटणार आहे पण सकारात्मक विचार आणि कामात व्यग्र ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्रात छोटे मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते आपणासाठी लाभकारक आहेत. भागीदाराच्या व्यवसायात आपणास चांगला फायदा होणार आहे.

तुळ - व्यवसायासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते आपणास मिळू शकते.आज आपणाला जास्त काम असणार आहे. हाताखालील व्यक्तींची मदत घ्यावी लागणार आहे.

वृश्चिक - वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. संतती कडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. लेखक कवी यांच्या लिखाणाची प्रशंसा होईल.

धनु - कुटुंबामध्ये एकोपा राहील याची आपण काळजी घेणार आहात. आपल्याकडे सकारात्मक विचार असल्याने कामांमध्ये प्रगती होणार आहे. त्यात आपणाला फायदा मिळेल.

मकर - नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न करा. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संदेश मिळणार आहेत. त्यादृष्टीने कामाचे नियोजन चांगल्या प्रकारे कराल.

कुंभ - आपले महत्वाचे कार्य आज सहजरीत्या होणार आहे.घरातील वातावरणही आनंदी असणार आहे. घरातल्यांचे सहकार्य आपणास मिळणार आहे.

मीन - दीर्घकालीन योजना तूर्तास थांबून ठेवा. आपल्याकडे जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत त्यातूनच उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळणे चांगले. दुसऱ्या वर जास्त विश्वास ठेवू नका.

मुंबईकरांना करदिलासा? BMC चा अर्थसंकल्प आज सादर होणार

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील औद्योगिक आस्थापनांना दिलासा; MPCB कडून संमतीपत्र मंजुरी, नुतनीकरणाचा कालावधी ५० टक्क्यांनी कमी

मुंबईतील हजारांहून अधिक बांधकामांना 'काम बंद'ची नोटीस; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पर्यावरण राज्यमंत्र्यांची कारवाई

यंदा कर्मचाऱ्यांना ९.१ टक्के सरासरी वेतनवाढ मिळणार; सर्वेक्षणाचा अंदाज