आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २६ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. मन सैरभैर होण्याची शक्यता आहे हे कार्यमग्न राहून आपल्या कामात लक्ष ठेवणे हितकारक ठरेल इतरांचा फारसा विचार करू नका.

वृषभ - आज नशिबाची साथ लाभल्यामुळे महत्त्वाची व प्रदीर्घ काळ रखडलेली कामे प्रयत्न केल्यास आश्चर्यकारकरित्या पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या कामात लक्ष द्या.

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील. आपल्याला अपेक्षित असलेली संधी मिळू शकते मात्र आपले कामाविषयी चे ज्ञान अद्यावत ठेवा.

कर्क - कार्य निमित्त छोटे-मोठे प्रवास घडतील. चांगल्या लोकांच्या संपर्कात याल. जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंदात दिवस जाईल.

सिंह - इतरांचा फारसा विचार न करता आपले मुद्दे ठामपणे मांडा. आपला अनुभव उपयोगी ला येऊ शकतो जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रसिद्धी मिळू शकते.

कन्या - आपल्या जोडीदाराला समजून घ्या. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. वाद-विवाद नको.

तुळ - पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती मधून नोकरी मिळू शकेल बेरोजगारांना रोजगार मिळवून नोकरीचा शोध संपेल. ओळखीतून कामे होतील.

वृश्चिक - कुटुंब परिवारात तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात आर्थिक कारणांवरून वाद-विवाद घडून कलह सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने वादविवाद टाळा.

धनु - घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातील. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. शांतपणे निर्णय घ्या.

मकर - एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिल्यामुळे समाजातील आपली पत प्रतिष्ठा वाढेल. दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.

कुंभ - आपल्याला इतरांची मते पटली नाहीत तरी आपले बोलणे मृदू ठेवा.मनोरंजनाकडे कल राहून मित्रमंडळींच्या समवेत मौजमजेत वेळ जाईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक.

मीन - अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवन साथी चे सहकार्य लाभेल. जवळचे प्रवास घडू शकतात.

मोदींच्या व्यापारदृष्टीने खुली केली जगाची दालने

देणग्यांची नाही ही तर विश्वासाची लूट

PCOS मुळे त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला ज्येष्ठमधाचा सोपा उपाय; असा बनवा हर्बल चहा

एकदा करून ठेवा, १५ दिवस खा! कडिपत्त्याच्या चटणीची सोपी रेसिपी

केस गळणे कमी करण्यासाठी कांद्याचा रस वापरता? आधी हे वाचा