आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 26, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील आरोग्य उत्तम राहील उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल.

वृषभ - नोकरीमध्ये हाताखालील लोकांची तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे लागेल.

मिथुन - कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह मधील अडथळे दूर होतील तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

कर्क - नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल तसेच कोणाबरोबरही वाद-विवाद करू नयेत मतभेदांची शक्यता.

सिंह - जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल नोकरीमध्ये तसेच व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

कन्या - कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधारण व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झालेल्या कारणांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल नवीन उधारी करू नका.

तुळ - आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल आरोग्य उत्तम राहून कुटुंब परिवारात एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता मिळेल. नोकरीमध्ये सर्वसामान्य परिस्थिती राहील.

वृश्चिक - महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कारणास्तव जवळचा तसाच दुरचा प्रवास घडेल प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा.

धनु - एखादा अप्रिय निर्णय स्वीकारावा लागल्या मुळे मनोबल कमी होईल परंतु नाराज होण्याची गरज नाही काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखादे नवीन नियोजन करू शकाल.

मकर - नोकरीमध्ये अथवा व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील मात्र आपल्या बोलणे, वागण्यावर वरती नियंत्रण आवश्यक आहे. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल.

कुंभ - स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. निरनिराळ्या नवीन संधींचा लाभ होईल.

मीन - कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा