आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - समाजामध्ये आपले वर्चस्व वाढणार आहे. अवघड कामे सुद्धा सहज रित्या पूर्ण करण्याची मानसिकता आपल्या मध्ये असणार आहे. पेंडिंग कामे पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ -आपल्यावर कामाचा ताण असणार आहे.थोड्या प्रकृतीच्या कुरबुरी असल्यामुळे चिडचिड होऊ शकते.आपल्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. आपण आपल्या बुद्धी चातुर्याने व कौशल्याने कोणत्याही प्रकारच्या कठीण समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकाल.

कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करतात त्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करा.

सिंह -आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन योजना आपण अमलात आणण्याचा प्रयत्न करत होता त्या योजना आता कार्यरत होतील.त्यातून सामाजिक आणि आर्थिक फायदा होणार आहे.

कन्या -आज आपल्या मध्ये मनोबल फार कमी असणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा. व्यापार व्यवसायामध्ये हवे तसे परिणाम मिळणार नाहीत.

तुळ - आपल्या व्यापार-व्यवसायात नवीन योजना अमलात आणू शकता. त्यातून आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात.आपला जबाबदारीचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगली वृद्धी होईल.

वृश्चिक - आपल्या जीवनसाथी व बरोबर छोट्या कारणांनी वाद-विवाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे.आपल्याला सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

धनु -विद्यार्थी वर्गाला काही नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखकांना चांगली संधी मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये नवीन नवीन योजना कार्यान्वित कराल.

मकर - आपण आपल्या कार्यक्षेत्रात किंवा खाजगी आयुष्यात प्रत्येक गोष्टी मध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणी आपल्या पद प्रतिष्ठेला बाधा आणत नाही ना याची काळजी घ्या.

कुंभ - ज्या जातकांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, त्यांना विदेशांमधून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये आता पेक्षा चांगली सुधारणा होणार आहे.

मीन -आपल्याला उत्पन्नाचे नवे साधन मिळू शकते. आर्थिक येणी येणार असतील तर ती येतील. कुटुंबीयांसाठी काही खर्च करणार आहात.

Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

अजित दादांना उद्या अखेरचा निरोप! पार्थिवावर सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी

उद्ध्वस्त...अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंनी एकाच शब्दात व्यक्त केल्या भावना