मेष - दैनंदिन कामाला अधिक वेळ व शक्ती खर्ची पडण्याची शक्यता आहे थोडे सबुरीने घ्या कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील मित्रपरिवारात प्रिय व्हाल.
वृषभ - आपल्यासमोर आज वेगवान घटना घडतील कार्य व्यक्ती वाढल्यामुळे जास्तीचे काम करावे लागेल कामाचे नियोजन महत्त्वाचे ठरेल मनाजोगती प्रगती करता येईल सरकारी कामे मार्गी लागतील.
मिथुन - नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा आपल्या तत्त्वांशी व कामाची एकनिष्ठ रहा शिस्त व कायद्याचे पालन करा सामाजिक जीवनात नावलौकिक होईल.
कर्क - प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील खर्चात वाढ झाल्यासारखी वाटेल परंतु त्याची पूर्तता होईल अनेक पातळीवर सकारात्मक बाबी घडतील एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल.
सिंह - आत्मविश्वासात वृद्धी करणार्या घटना घडतील आपल्या कार्यक्षेत्रात अथवा नोकरीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल आपल्या कार्याची प्रशंसा होईल इतरांवर प्रभाव राहील.
कन्या - आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो कोणत्याही प्रतिकूल प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे जा जवळच्या माणसांकडून वेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे.
तुळ - आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका खर्चात वाढ होऊ शकते दूरच्या प्रस्तावाचे नियोजन होईल मित्रमंडळी या समावेत एखाद्या समारंभाला उपस्थित रहाल.
वृश्चिक - कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे फसव्या जाहिरातबाजीला बळी पडू नका जमीन जवळ यांचे व्यवहार शक्यतो पुढे करावेत.
धनु - आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील प्रवासाचे योग आहेत मात्र प्रवासात थोडा त्रास संभवतो कौटुंबिक बाबींमुळे मनस्वास्थ्य बिघडू शकते.
मकर - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्य शैलीचे कौतुक होईल आर्थिक बाजू चांगली राहील अपेक्षित गोष्टी घडल्याने कार्य व उत्साह वाढेल.
कुंभ - आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता कर्ज देणे घेणे टाळा व्यवसाय धंद्यामध्ये उधारी उसनवारी नको. कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील एखादे मंगल कार्य ठरू शकते.
मीन - आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल आहारावर नियंत्रण आवश्यक राहील आपले म्हणणे ठामपणे मांडला अपेक्षित कामे पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल.