मेष - महत्त्वाच्या कामात निर्णय घ्यावे लागतील. आत्मविश्वासपूर्ण व धाडसाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील रखडलेली कामे मार्गी लावण्यात यश प्राप्त होईल.
वृषभ - विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत चांगला आहे केलेल्या कष्टाचे फळ मिळेल अभ्यासात लक्ष लागेल स्पर्धात्मक यश मिळवू शकाल.
मिथुन - समाजातील मान्यवरांचा नवीन ओळखी होतील अपेक्षित गाठीभेटी होऊन महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल मित्रमंडळींकडून मदतीचा हात मिळेल.
कर्क - रोजच्या नेहमीच्या कामात थोडे बदल आयत्या वेळेस करावे लागतील. नवीन नवीन कल्पना सुचतील, तो व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल.
सिंह - काही वेळेस आक्रमक निर्णय घ्यावे लागतील. आश्चर्यकारक घटना घडतील. अनपेक्षित गाठीभेटी होऊन महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कन्या - नोकरीमध्ये आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता बौद्धिक कौशल्य पणाला लागेल. वरिष्ठांच्या बरोबर वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
तुळ - महत्त्वाच्या घटनेमध्ये स्वकर्तृत्व दाखवून द्याल. कुटुंब परिवारात तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात कौतुकाचा विषय बनू शकता. इतरांना मदत सर्व प्रकारे कराल.
वृश्चिक - पूर्वी केलेल्या नियोजनाबद्दल पुनर्विचार आवश्यक राहील एखादा संकल्प पूर्णपणे व शांतपणे विचार करून अमलात आणा. वादविवाद टाळा.
धनु - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्यायला मन उद्युक्त होईल. दानधर्म कराल घरातील प्रश्न अथवा समस्या चर्चेने सोडवता येतील.
मकर - एखादे रखडलेले काम झाल्यामुळे उत्साह वाढेल तसेच आत्मविश्वास निर्माण होईल. आनंदाच्या भरात इतरांना दुखवू नका.
कुंभ - व्यवसाय धंद्यामध्ये अनपेक्षितपणे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात विशेषतः भागीदारी व्यवसायात भागीदाराची समजूत काढणे अपरिहार्य ठरेल.
मीन - मन धार्मिकते कडे ओढ घेईल. सहकुटुंब सहपरिवार तसेच मित्र मंडळ यांच्या समवेत एखाद्या धार्मिक स्थळी दर्शनाचा लाभ घ्याल. दिवस आनंदात व्यतीत होईल.