आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३० मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 30, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मानसिक प्रसन्नता लाभेल. आपल्या निर्णयांमुळे इतर प्रभावित होतील. आपल्या शब्दाला मान मिळेल. कर्तृत्वाला संधी लावेल. धनलाभाचे योग.

वृषभ - हाती घेतलेले कार्य जिद्दीने पूर्ण कराल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील नशिबाची साथ पूर्णपणे मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात येईल.

मिथुन - व्यवसाय धंद्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील तसेच महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल मात्र सरकारी नियम पाळा. आरोग्य चांगले राहील.

कर्क - कुटुंबात तसंच कार्यक्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल व आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावी आपले निर्णय अचूक ठरतील. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

सिंह - आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल प्रामुख्याने व्यवसाय धंद्यात कामाची क्रमवारी बदलावी लागेल. आयत्या वेळेस कामाच्या स्वरूपात वाढ होईल.

कन्या - मनोबल काहीसे कमी राहिल्यामुळे आत्मविश्वासही कमी राहील दैनंदिन कामात अचानक समस्या निर्माण होण्याची शक्यता. प्रयत्न कमी पडून देऊ नका.

तुळ - व्यवसाय धंद्यात नवीन हितसंबंध निर्माण होतील तसेच काही फायद्याचे सौदे हाती येतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.

वृश्चिक - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल तुमचे कार्यक्षेत्र वाढल्यामुळे जबाबदारी पण वाढेल. सरकारी नोकरीत बदलीची शक्यता तसेच कामाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो.

धनु - महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी. नवीन गुंतवणुका शक्यतो टाळाव्यात. लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल.

मकर - आपल्या कार्यक्षेत्र व कुटुंबात अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि उमेद वाढेल आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल मात्र इतरांचा अपमान करणे टाळा.

कुंभ - अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल व्यवसाय धंद्यात नवीन समस्या उभा राहण्याची शक्यता तसेच कामगार विषयक प्रश्न उभे राहतील राजकारणामध्ये विरोधक प्रबळ होतील.

मीन - महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबात सुखद वार्ता मिळतील. कुटुंब परिवारासह लहान अंतराचे प्रवासाचे योग संभवतात.

कैरीचा सीझन सुरू! घरच्या घरी बनवा आंबट-गोड 'आमपापड'; स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन