आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ५ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 5, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कामातील प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. परदेशातून काही शुभ संदेश येण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर चांगले यश येईल.

वृषभ -आर्थिक प्रश्‍न सुटणार आहेत.आपण घेतलेल्या निर्णयात कुटुंबीय आपणाशी सहमत असणार आहेत.घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे त्यांचा पाहुणचार आदरतिथ्य चांगले कराल.

मिथुन - व्यापार व्यवसायात लक्ष देणे फार गरजेचे आहे. आपणाला कामाच्या नवीन संधी येण्याच्या शक्यता आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

कर्क - आजचा दिवस आपणासाठी फार अनुकूल नाही. कामाचा दबाव खूप असणार आहे. कामामध्ये खूप अडचणी आल्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता. मन शांत ठेवून कामे करा.

सिंह -आजचा आपला दिवस फार धावपळीचा जाऊ शकतो. महत्वाची कामे आज करणार आहात. मित्रांच्या सहकार्यामुळे कामामध्ये सुरळीतता लाभणार आहे. आनंदी दिवस.

कन्या -आजचा दिवस आपणास सर्वतोपरी चांगला जाणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. तुमचे स्वतःचे प्रयत्न सातत्याने केल्यास व योग्य रीतीने झाल्यास आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ होईल.

तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दृष्टिकोन सकारात्मक असणार आहे.तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य व आनंद मिळणार आहे. विरोधकांवर मात करू शकणार आहात.

वृश्चिक - कोणत्याही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना फार धोका पत्करू नका. आज आपण सातत्याने काम केल्यास कामा मध्ये यश येण्याची शक्यता आहे.

धनु -आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कामामध्ये शांतपणा तसेच नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षा पेक्षा कमी मिळणार आहे.

मकर - नोकरीमध्ये आपला दिवस चांगला जाणार आहे.आपल्याला जास्त काम पडले तरी हाताखालील लोकांचे सहकार्य मिळणार आहे. मात्र शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे.

कुंभ -आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे.लेखक कवी यांच्या लिखाणासाठी त्यांची प्रशंसा होणार आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे.

मीन - आजचा दिवस चांगल्या कारकिर्दी ने सुरू होणार आहे.करियर मध्ये चांगले बदल होण्याची शक्यता आहे.नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार आहे.

हनीमून मर्डर 2.0 ! पत्नीनेच काढला पतीचा काटा; प्रियकरासह रचला होता कट, पोलिसांच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर

३३ तासांनंतर...मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अभूतपूर्व कोंडी फुटली, अखेर टँकर हटवला