मेष - जीवनसाथी शी मधुर संबंध राहतील भेट वस्तू द्याल तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश मिळेल महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज किंवा वादविवाद टाळणे हितकारक ठरेल.
वृषभ - कुटुंबातील मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. नोकरीमध्ये आपल्या आपल्या मतास प्राधान्य मिळेल. प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.
मिथुन - भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील जवळचा प्रवास करू शकतो व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक उन्नती होईल. प्रवासाचे योग.
कर्क - कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात याल. व्यावसायिक रेंगाळलेली कामे गतिमान होऊन पूर्ण होतील.
सिंह - घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेल नोकरदारांना दिलासा मिळून महत्त्वाचे काम होईल पण जबाबदारीमध्ये बदल संभवतो. जीवनसाथी बरोबर मधुर संबंध राहतील.
कन्या - प्रवासाची शक्यता. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे अतिआत्मविश्वास टाळा तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक. प्रकृती स्वास्थ्य ठीक असेल.
तुळ - यशदायी स्वरूपाचा दिवस राहणार आहे. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीत यश मिळेल कलाकार व साहित्य क्षेत्रातील जातकांना प्रसिद्धी बरोबर उत्पन्नात वाढ.
वृश्चिक - अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे मात्र कोणाविषयी शेरेबाजी करू नका.
धनु - नोकरीत आपल्या कामाविषयी चे ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता. महत्त्वाचे काम पूर्ण होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.
मकर - नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळण्यास विशेष प्रयत्न करावे लागतील कोणालाही दुखवू नका.
कुंभ - कुटुंबासाठी खरेदी होईल घरातील भौतिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल मनोरंजनात वेळ मित्रमंडळींसह जाईल.
मीन - आशावादी स्वरुपाचा दिवस राहील नोकरदारांना दिलासा मिळेल राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा दिवस चांगला जाऊ शकतो.