आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,८ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - नोकरीमध्ये आणि व्यवसाय धंद्यात चांगले वातावरण राहील अनपेक्षित चांगल्या घटना घडतील काहींच्या घरात मंगल कार्य करतील. ज्येष्ठ व गुरुवर्य यांचे आशीर्वाद मिळतील.

वृषभ - आर्थिक भरभराट होईल कुटुंब परिवरातील सदस्य सहकार्य करतील जमीन जुमला तसेच वास्तुविषयक व्यवहार सुकर होतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करता येईल.

मिथुन - आजच्या दिवसात आपण चांगली प्रगती करू शकाल महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल शिक्षण नोकरी व विवाह इत्यादी बद्दलचे कार्य होईल इतरांची मदत मिळेल.

कर्क - व्यवसाय धंद्यातील कायदेविषयक प्रश्न सुटतील कुटुंब परिवारातील मुला मुलींकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे संबंध चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

सिंह - कुटुंब परिवार तसेच नोकरीमध्ये इतरांशी मतभेद होऊ शकतात ते टाळणे गरजेचे ठरेल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.

कन्या - कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील घरामधील वातावरण आनंदाचे राहील नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील.

तुळ - स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या जुनाट व्याधी उद्भवण्याची शक्यता आहे तरुण-तरुणींची स्वप्ने साकार होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील नोकरीमध्ये सर्व सामान्य परिस्थिती राहिल.

वृश्चिक - आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आपल्या रागावर नियंत्रण आवश्यक कुटुंबातील वाद-विवाद यांच्याकडे दुर्लक्ष करा.

धनु - नोकरीत भाग्योदय होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश अनुभवता येईल तरुण-तरुणींना परदेश गमनाच्या संधी मिळू शकतात प्रेमामध्ये यश मिळेल.

मकर - कुटुंब परिवार तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला सर्वांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल सुवार्ता मिळतील नोकरी मधील परिस्थिती राहील मात्र कोणाशीही वाद-विवाद करू नका.

कुंभ - तरुण-तरुणींचे नोकरी विषयक प्रश्न सुटतील कलाकार खेळाडूंना प्रसिद्धीचे योग. वास्तुविषयक व्यवहार गतिशील होतील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.

मीन - व्यवसाय-धंद्यात बदल घडेल काही सकारात्मक घटना घडल्यामुळे उत्साहात वाढ होईल. नवीन करार होऊ शकतात. प्रवासाचे योग पण प्रवास करताना सावध राहणे गरजेचे ठरेल.

‘विश्वगुरू’ भारताचे विदेश नीतीमध्ये फसलेले पाऊल

Kitchen Tips : किचनमध्ये कुबट वास येतोय? 'हे' उपाय करा आणि घर ठेवा फ्रेश

Summer Special : फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक; टेस्टी आणि हेल्दी ड्रिंक, ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय

THANE : घोडबंदर रोडवर मध्यरात्री वाहतूक निर्बंध; प्रवासाआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक