

GTA 6 गेमची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता Instagram वर एका नव्या AI फोटो ट्रेंडची भर पडली आहे. या ट्रेंडमध्ये साध्या सेल्फीला GTA 6 गेमच्या पोस्टरसारखा लूक दिला जात आहे. निऑन लाइट्स, नारळाची झाडं, आलिशान स्पोर्ट्स कार आणि रंगीबेरंगी सूर्यास्त अशा पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो पाहण्याची संधी या ट्रेंडमुळे मिळत आहे. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला फोटो एडिटिंगचं विशेष ज्ञान असण्याची गरज नाही. फक्त एक चांगला सेल्फी, AI इमेज जनरेटर आणि योग्य Prompt वापरून तुम्हीही असा फोटो तयार करू शकता. Google Gemini आणि ChatGPT च्या मदतीने ही प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे.
काय आहे GTA 6 AI फोटो ट्रेंड?
Grand Theft Auto म्हणजेच GTA गेम सीरिजची ओळख तिच्या खास पोस्टर स्टाइलमुळे आहे. ठळक आऊटलाइन, उठावदार रंग, सूर्यास्ताची आकर्षक पार्श्वभूमी, निऑन साइनबोर्ड आणि समुद्रकिनाऱ्यालगतचे रस्ते या गोष्टी या पोस्टरमध्ये पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या AI ट्रेंडमध्ये याच स्टाइलचा वापर करून सामान्य सेल्फीला गेमच्या पोस्टरसारखा लूक दिला जात आहे.
या ट्रेंडमध्ये तुम्ही दोन प्रकारचे फोटो तयार करू शकता. पहिला म्हणजे गेमच्या पोस्टरसारखा चित्रमय आणि रंगीत लूक, तर दुसरा म्हणजे गेममधील प्रत्यक्ष दृश्यासारखा दिसणारा फोटो. त्यामुळे तुमचा साधा सेल्फीही एखाद्या व्हिडीओ गेमच्या कव्हर आर्टमधील फोटोसारखा दिसू शकतो.
Google Gemini वर GTA 6 स्टाइलचा फोटो कसा तयार कराल?
Google Gemini च्या मदतीने आधीपासून असलेल्या फोटोला वेगळा लूक देता येतो. यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
१. Google Gemini उघडा : सर्वप्रथम Gemini ची वेबसाइट किंवा मोबाइल अॅप उघडा. तुमच्या Google अकाउंटने लॉग इन करून नवीन चॅट सुरू करा. इमेज तयार करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा.
२. तुमचा सेल्फी अपलोड करा : चॅटमधील अटॅचमेंट पर्यायावर क्लिक करून गॅलरी किंवा कॉम्प्युटरमधील फोटो निवडा. फोटो स्पष्ट असावा. चेहरा समोरून दिसणारा आणि पुरेसा प्रकाश असलेला फोटो निवडल्यास चांगला परिणाम मिळू शकतो. चेहऱ्यावर जास्त सावल्या असलेले फोटो शक्यतो टाळा.
३. योग्य AI Prompt टाका : फोटो अपलोड केल्यानंतर त्याला कोणता लूक द्यायचा आहे, हे Prompt मधून स्पष्ट सांगा. खाली दिलेला Prompt कॉपी करून वापरू शकता.
AI Prompt :
Turn the uploaded photograph into a high-quality open-world crime video game poster inspired by the visual aesthetic of Grand Theft Auto. Keep the person’s facial features, hairstyle, expression and overall identity recognisable without beautifying or altering their face. Give the image a bold illustrated appearance with sharp outlines, vibrant colours, dramatic cinematic lighting and a detailed Vice City-inspired coastal backdrop. Include luxury sports cars, palm trees, neon-lit urban streets and a glowing sunset sky. Use a stylish video game poster composition with rich textures and no text or logos.
४. फोटो तयार करा आणि बदल करून घ्या : Prompt पाठवल्यानंतर Gemini फोटो तयार करेल. पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित फोटो मिळाला नाही, तर चॅटमध्ये आणखी सूचना देऊ शकता. उदाहरणार्थ, "माझ्या मूळ फोटोतील चेहऱ्याची वैशिष्ट्ये कायम ठेवा आणि गुलाबी-नारंगी सूर्यास्ताचे रंग अधिक उठावदार करा," अशी सूचना दिल्यास फोटोमध्ये आवश्यक बदल करता येतील.
५. फोटो सेव्ह करा : तयार झालेला फोटो डिव्हाइसवर सेव्ह करा. त्यानंतर तो Instagram पोस्ट, स्टोरी किंवा WhatsApp DP म्हणून वापरू शकता.
ChatGPT वरूनही तयार करता येईल GTA 6 स्टाइलचा फोटो
Google Gemini प्रमाणेच ChatGPT च्या मदतीनेही तुम्ही तुमच्या सेल्फीला GTA 6 गेमच्या पोस्टरसारखा लूक देऊ शकता. यासाठी ChatGPT मध्ये तुमचा स्पष्ट फोटो अपलोड करा आणि त्याला GTA 6 पासून प्रेरित गेम पोस्टर स्टाइलमध्ये बदलण्याची सूचना द्या. फोटोमधील चेहरा, हेअरस्टाइल आणि मूळ व्यक्तिमत्त्व कायम ठेवण्यास स्पष्टपणे सांगा. तसेच व्हाइस सिटीप्रमाणे समुद्रकिनारा, नारळाची झाडं, स्पोर्ट्स कार, निऑन लाइट्स आणि सूर्यास्ताची पार्श्वभूमी देण्याची सूचना करू शकता.
AI फोटो तयार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
स्पष्ट फोटो निवडा : धूसर किंवा खूप लांबून काढलेल्या फोटोमध्ये चेहऱ्याची वैशिष्ट्ये अचूक जपणं AI साठी कठीण होऊ शकतं.
चेहरा बदलू देऊ नका : Prompt मध्ये चेहऱ्याची मूळ वैशिष्ट्ये, हेअरस्टाइल आणि हावभाव कायम ठेवण्यास सांगा.
पार्श्वभूमी स्पष्ट करा : सूर्यास्त, निऑन लाइट्स किंवा शहरातील पावसाळी रस्ते अशा सूचना दिल्यास फोटोला हवा तसा लूक मिळू शकतो.
फोटो नीट तपासा : तयार झालेल्या फोटोमध्ये हातांची बोटं, दागिने, चष्मा आणि पार्श्वभूमीतील गाड्या यांसारख्या गोष्टींमध्ये AI मुळे चुका होऊ शकतात. त्यामुळे फोटो शेअर करण्यापूर्वी तो नीट तपासा.
गोपनीयतेची काळजी घ्या : फोटो अपलोड करताना त्यात संवेदनशील माहिती दिसणार नाही याची काळजी घ्या. तसेच संबंधित व्यक्तीची परवानगी नसताना तिच्या फोटोमध्ये असे बदल करू नका.