आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : आपला आजचा दिवस बस खूप कामाचा असणार आहे. तरीही आपण आपल्या साठी वेळ काढा व आपले काही रचनात्मक कार्य पूर्ण करा. कुटुंबातल्या कामांना महत्त्व द्याल.

वृषभ: मानसिक शांततेसाठी आपला तणाव दूर करणे आवश्यक आहे. मागच्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायांमध्ये आपणास काम जास्त असू शकते .

मिथुन : आज सातत्याने निरंतर प्रयत्न केल्यामुळेच काही फायदे होतील . नवीन व्यक्तींची ओळख होईल, मित्रपरिवाहात विस्तार होणार आहे. कोणत्याही व्यवहारात नीट लक्ष द्यावे व चातुर्य वापरावे.

कर्क : कोणावरही टीका करू नका, दुसऱ्यांच्या भावना समजून घ्या. आजचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरणार आहे. भागीदारीत सहकार्य मिळणार आहे.

सिंह : आज आपण प्रवासाच्या संधी शोधाल.देण्याघेण्याच्या व्यवहारात काही विसंवाद होण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना दक्ष असावे, जास्त वाद न घालता व्यवहार पूर्ण करावेत.

कन्या : आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. तुमचे मन उल्हासित असेल. आपणा मध्ये पूर्ण ऊर्जा असणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासही असणार आहे. आपले व्यवस्थापन आपणच करा.

तुळ : एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल. तेथे आपण चमकणार आहे तुम्ही ज्या योजना आखणार आहात त्या योजना इतरांना सांगू नका, कार्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : स्वतःचे काम स्वतः करा निर्णय स्वतःचे असू द्या कोणाच्याही सल्ल्याने काम करू नका अन्यथा आपणास डान्स मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. कार्यसिद्धी होईल.यशस्वी दिवस.

धनु : आपणास कामाचे नियोजन करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीत तेथून पळून जाऊ नका. येणे केने प्रकारे आपणाला परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.

मकर : आत्मविश्वसाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा प्रत्यक्षात येतील. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली आहे.

कुंभ : काही नातेवाईक यांची अचानक भेट होऊ शकते.आपला व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी जोडीदाराची मदत मिळणार आहे आपल्याला पटेल अशाच योजना आपण अमलात आणा.

मीन : आजचा दिवस आनंदात चालवण्याचा प्रयत्न करणार आहात.मात्र कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका.मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.

Mumbai : ३,५०० इमारतींना ओसी मिळणार; स्थायी समितीत एकमताने प्रस्ताव मंजूर

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक; डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर कारवाई

Pune : कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीती

Mumbai : बेस्ट बसने पादचाऱ्याला चिरडले

कांदिवलीत विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू