राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 10, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - संयमाने वागणे आवश्यक आहे. व्यवहार करताना फार दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नव्या संकल्पना साठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. व्यवसायिक यश.

वृषभ - मनासारखी आर्थिक प्राप्ती असणार आहे. त्यामुळे कार्य उत्साहाने कराल. मित्र परिवारामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहार निश्चितच टाळा. प्रवासात मोठा त्रास संभवतो.

मिथुन - आज आपणास अडचणीच्या मार्गातून काम करावे लागेल.अडचणींवर मात करावीच लागेल. कर्ज देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे.

कर्क - कामाचे स्वरूप वाढणार आहे. आपले नियोजन व्यवस्थित होणार आहे. कामे मार्गी लावाल. व्यवहार पूर्ण करून फायदे होतील. कुटुंबामधील वातावरण आनंदमय राहील.

सिंह - आजचा दिवस यशस्वी जाणार आहे. समाजात मान वाढेल सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. ओळखीचा फायदा होईल. जोडीदाराचा सल्ला ऐका. नवीन संधी मिळेल.

कन्या - कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह येणार आहे. योग्य ठिकाणी वर्चस्व दाखवण्याची संधी प्राप्त होईल.

तूळ - रखडलेली कामे मार्गी लावायचा प्रयत्न करा ,कामाची क्रमवारीठरवून घ्या. मोठे व्यवहार करताना वरिष्ठ किंवा तज्ञ यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक - प्रिय व्यक्तीचा सहवास समाधान देईल. आर्थिक गुंतवणूक वाढवणार आहात. मनाजोगता पैसा मिळेल बुद्धिचातुर्य व अंगी असलेले कला गुण यामुळे कामाचे सोने कराल.

धनु - आपली नेमकी उद्दिष्टे कोणती हे ठरवून वागण्याचा कालावधी, नोकरी व्यवसायातील नवीन कार्यभाग आणि वाढत्या जबाबदाऱ्या यांचा योग्य समन्वय तुम्हाला साधावा लागणार आहे.

मकर - आपल्या सहवासातील व्यक्तींचा प्रभाव भाव आपल्यावर पडत नाही याची खात्री करून घ्या. व्यवहार करताना व्यवहार नीट समजून घ्या. देण्याघेण्याच्या व्यवहाराची लेखी नोंद ठेवा.

कुंभ - आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीमध्ये काम भरपूर असणार आहे. त्यामुळे हाताखालील व्यक्तींची साहाय्य घ्यावे. लागेल कामाचा ताण येऊ देऊ नका.

मीन - नोकरी-व्यवसायात तुमच्या संकल्पना अमलात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आपणास सहज शक्य अशी काम होतील.

AQI १०५ वर पोहोचला! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक गाठण्याची शक्यता

उमेश कोल्हे हत्याकांड : विशेष NIA न्यायालयाने शकील शेखचा फेटाळला जामीन

Mumbai Metro 3 : पहिल्याच दिवशी चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पूर्वी भ्रूण गोठवले असल्यास सरोगसी कायद्यातून सूट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ई-बस प्रवाशांसाठी खुशखबर; एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना