राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 30, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज आपल्या आत्मविश्वासात चांगली वाढ होणार आहे. कामाचे नवे प्रस्ताव समोर येणार आहेत. व्यवसायात प्रगती होणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. कुटुंबासाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे.

वृषभ - आपला रुबाब आणि अधिकार आज वाढणार आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये प्रगती होणार आहे. शत्रूचा पराभव होणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा दूरचा विचार करा.

मिथुन - मानसिकता थोडी कमकुवत असण्याची शक्यता आहे. आपणास काही मोहाचे क्षण येण्याची शक्यता आहे फसवणूक होण्याचा संभव आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. देण्याघेण्याचे व्यवहार दक्ष राहून करणे.

कर्क - आपण घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे. भावनेपेक्षा व्यवहाराकडे जास्त लक्ष द्या. आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांचा सहयोग मिळणार आहे, आज आपला मनोरंजनाकडे कल असणार आहे.

सिंह - आपल्यामध्ये रुबाब आहेच पण आज आपल्या कामामुळे तो वाढणार आहे आपल्या बुद्धिचातुयनि केलेल्या कामांमध्ये अपेक्षा पेक्षा जास्त यश येणार आहे. आजचा दिवस यशस्वितेचा असणार आहे.

कन्या - कामाच्या ठिकाणी आपला वरचष्मा राहणार आहे. धनलाभाचे योग आहेत. कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात फसगत होण्याची शक्यता आहे.

तुळ - मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. चंचल मनाला ल गाम केव्हा आणि कोठे घालावयाचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेत फायदा होणार आहे. खर्च विचारपूर्वक करा. प्रकृतीला जपा.

वृश्चिक - बोलताना भान ठेवा शब्द जपून वापरा नाहीतर बीपी परिणाम होण्याची शक्यता कामासाठी बाहेर पडताना आईचा आशीर्वाद घ्या. अपेक्षित यश निश्चित मिळेल. भागीदारामुळे चांगले लाभ होतील.

धनु - नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती होणार आहे. लोन साठी प्रयत्न करत असाल तर आज त्यामध्ये यश येणार आहे. कामानिमित्त प्रवास - करण्याची शक्यता आहे पण प्रवासात त्रास होऊ शकतो.

मकर - पती-पत्नी मधील वाद वाढवू शकतो. आपण खुप सामंजस्याने घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे उच्च - शिक्षणाची द्वारे खुली होऊन मनाप्रमाणे प्रवेश मिळतील. चांगले लाभ होतील.

कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात नवीन योजना अमलात आणल. गुरूंचे आशीर्वाद मिळणार आहेत. त्यामुळे कार्य क्षेत्रात चांगली प्रगती होईल. घरातल्या व्यवहारांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

मीन - आपल्याला आज चांगली बातमी मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित बदल होतील. आपल्याला नातेवाईकांना मदत करावी लागणार आहे. भविष्यात याचा चांगला उपयोग होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...