राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 20, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा

नवशक्ती Web Desk

मेष : अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्या. अडचणींवर मात कराल, मात्र स्वतःचे वर्तन व बोलण्यावर नियंत्रणाची गरज. महत्त्वाच्या बातम्या हाती येतील.

वृषभ : आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर व स्मरणशक्तीच्या सहाय्याने महत्त्वाची कार्य पार पाडता येतील. काही ठिकाणी राजकारणाचा वापर करावा लागेल. धनलाभाचे योग.

मिथुन : कौटुंबिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहून संततीविषयी चांगल्या गोष्टी कानावर पडतील. काहींना नोकरीचे योग. पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.

कर्क : नवीन उधारी टाळा. वेळेचे तसेच आर्थिक नियोजन करणे हिताचे ठरेल. कुसंगती टाळा. वाहने चालवताना वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.

सिंह : नोकरीमध्ये तसेच कार्यस्थळी जबाबदारीमध्ये वाढ होईल. इतरांवर अवलंबून राहू नका तसेच कौटुंबिक जबाबदारी सांभाळा. सामाजिक मानसन्मान मिळेल.

कन्या : कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताला उचित प्राधान्य द्या. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल.

तुळ : स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल. इतरांना मदत कराल. दिवस धावपळीचा जाईल. मनास आनंदी करणाऱ्या वार्ता मिळतील. खुश असाल.

वृश्चिक : व्यवसायात नवीन-नवीन संधि मिळतील. नियोजन यशस्वी होईल. अपेक्षित गोष्टी घडतील. समाजातील प्रतिष्ठित, थोरा-मोठ्यांची ओळख होईल.

धनु : आपली मते इतरांना पटवून देता येतील. इतरांवर आपला प्रभाव जाणवेल. नोकरीत समाधान लाभून वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्यास जपा.

मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरीतीने पार पाडाल. व्यवसायात नवीन नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा यशस्वीरीत्या वापर कराल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कुंभ : कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. याकडे लक्ष द्या. कुसंगती नको. आर्थिक आवक ठीकठाक राहील. नोकरीत प्रगती संभवते, शेतीच्या कामात यश मिळेल.

मीन : लहान-मोठे निर्णय घ्यावे लागतील. जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल. त्यामुळे समाधान वाटेल. नातेवाईक भेटतील. घरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन