आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 20, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील.

वृषभ - व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. कामाचा व्याप वाढणार आहे. भागीदाराचे सहयोग मिळेलच, त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील.

मिथुन - तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा. उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील. जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार.

कर्क - आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे. महत्त्वाची कामे करून घ्या.

सिंह - प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मालमत्तेसंबंधी जे काही प्रश्न आहेत ते सर्वांनी मिळून सोडवावे लागणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठांचा सल्ला आपणास फायदेशीर ठरेल.

कन्या - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. आनंदित राहाल. आज कोणत्याही प्रकारचा ताण असणार नाही. नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील रहाल.

तुळ - घरातील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल पण तो खर्च आनंदासाठी करणार आहात.

वृश्चिक - तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे. चांगल्या संधी येणार आहे, संधीचे चांगले सोने कराल. व्यवसाय वृद्धीचे प्रयत्न चांगले होतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

धनु - व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. व्यापार व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे की नाही याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

मकर - जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता. त्यासाठी मित्र व सहकारी यांचे सहकार्य घ्याल. आर्थिक चणचण कमी होईल, त्यामुळे समाधानी राहील. खर्चही कराल.

कुंभ - कामाचा उत्साह राहणार आहे. बुद्धी कौशल्याने कामे करून घ्याल. लोकांची मने जिंकाल. सामाजिक कार्य व लोकशिक्षणाचे कार्य यामध्ये सहभागी व्हाल.

मीन - कामामध्ये लक्ष केंद्रित असेल, त्यामुळे कामे चांगली होतील. मोठे निर्णय घ्याल ते बरोबर ठरतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सहाय्य लाभणार आहे.

नवरा, मुलगा किंवा मुलगी नसलेल्या महिलांनी खटले टाळण्यासाठी इच्छापत्र करावे ; सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळमर्यादा लागू करता येईल का? सर्वोच्च न्यायालय आज देणार महत्त्वाचा निर्णय

Navi Mumbai: भाजप - शिंदे गटातील धुसफूस न्यायालयात, भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आक्षेप

जुन्या वाहनांचे आयुष्य आता १० वर्षेच; फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आरक्षण वाद: नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा; SCची राज्य सरकारला सूचना