डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह
परदेशगमनाचे योग
सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचे चार चरण, फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचा पहिला चरण मिळून नऊ नक्षत्रांची सिंह रास बनते. चांदण्यांनी तयार झालेल्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या सिंहाच्या आकृतीस सिंह रास म्हणून ओळखतात. सिंह रास म्हणजे औदार्य, अधिकार, लालसा, सत्तेचा लोभ, कर्तृत्व, स्वावलंबित्व व राजेपणा हे सिंहाचे जन्मताच गुण सिंह राशीमध्ये आढळतात. सिंह राशी बलवान असणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांनी आपल्या ताब्यात राहावे व वागावे. आपले नेतृत्व स्वीकारावे अशी प्रवृत्ती निसर्गात असते. सिंह राशी पाच आकड्यांनी जन्म कुंडलीमध्ये दाखवतात.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये आपण शिक्षण घेत असाल तर आपल्यासाठी सध्याच्या कालावधीतील वातावरण अनुकूल राहील. विशेषतः तांत्रिकी शिक्षणामध्ये विशेष प्रगती होईल. कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी चालून येतील, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना व कष्टांना योग्य ते फळ मिळेल. परदेशासाठी तसेच परदेशातील परीक्षेसाठी अनुकूल कालावधी आहेे. या कामी आपल्याला इतरांचे सहकार्य मिळत राहील.
पारिवारिक : कुटुंबामध्ये सर्वांशी संबंध ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. संततीविषयी चांगल्या वार्ता कानावर येतील. मुलांची तसेच मुलींची सुद्धा प्रगती होईल. मुला-मुलींचे सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल. वाढत्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करू शकाल. कुटुंबात एखादे धार्मिक अथवा मंगलकार्य घटित होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आरोग्य चांगले राहील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : व्यवसाय-धंदा अथवा नोकरीनिमित्त किंवा वैयक्तिक कारणांनी परदेशगमनाचे योग आहेत. विशेषतः आयात-निर्यात क्षेत्रातील जातकांना परदेशवारीची शक्यता. परदेशी संबंध दृढ होतील. जुने संबंध नव्याने प्रस्थापित होऊ शकतात. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल तसेच समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा सहवास मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात घवघवीत यश मिळेल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेता येईल. या कालावधीत आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात. नोकरीमध्ये आपण आपले काम सातत्याने व नीटनेटके होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहात. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी टिकवून ठेवण्यात यश प्राप्त होईल. त्याचप्रमाणे ज्या जातकांना नोकरी नाही त्यांना ती मिळवण्यामध्ये यश मिळेल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून त्यामध्ये बदल करू शकाल तसेच व्यवसायाच्या विस्तार योजना कार्यान्वयित करू शकाल. व्यवसायात भागीदाराच्या मतास प्राधान्य दिल्यास ते पोषक ठरेल. व्यावसायिक कोर्ट प्रकरणे संपुष्टात येतील.
शुभ दिनांक : ५, ६, १५, २१, २५, २९
अशुभ दिनांक : ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१
कन्या
करमणुकीसाठी खर्च कराल
कन्या राशीमध्ये सव्वादोन नक्षत्र आहेत तो तर नक्षत्राचा दुसरा- तिसरा चौथा चरण, हस्त नक्षत्राचे चार चरण व चित्रा नक्षत्राचा पहिला चरण व दुसऱ्या चरण मिळून नऊ चरणांनी कन्या रास तयार होते. या नक्षत्र चरणातील बदललेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या मुलीच्या कृतीस कन्या राशी म्हणतात. ही मुलगी बारा वर्षांची आहे. ही कन्या नौकेत बसलेली आहे. तिच्या हातात धान्याचे कणीस व दुसऱ्या हातात अग्नी किंवा दिवा आहे. या कन्येच्या अंगात व्यवस्थितपणा व व्यवहार कुशलता, हिशेबीपणा, मोहक सौंदर्य व प्रमाणशीर अवयव रचना, चौकसपणा, धान्य संग्रहाची आवड. दुसऱ्यास मार्गदर्शन करण्याची उत्सुकता आणि दुसऱ्याचे पोषण करण्याची कळकळ असे प्रमुख गुण आहेत. एखाद्या पुरुषाच्या सर्व सत्वर्तनाबद्दल अचूक निर्णय घेणे हे महत्त्वाचे कार्य आहे. कारण तिने दिलेला हा तिचा निर्णय ग्राह्य समजावा इतका तो अचूक असतो. ही रास राशीचक्रामध्ये सहा आकड्याने दर्शवितात.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल कालावधी असला तरी आपल्या कष्टाने तो यशस्वी होईल. परिश्रम व्यवस्थित घेतल्यास अपेक्षित यश मिळू शकेल. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये यशप्राप्ती होऊ शकते. परदेशसंबंधी सर्व प्रकारात मात्र जास्त प्रयत्नांची व योग्य दिशेने प्रयत्न करण्याची विशेष आवश्यकता राहील. आपल्याला मार्गदर्शन मिळवावे लागेल.
पारिवारिक : कुटुंबामध्ये आयत्या वेळेस काही प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागेल. असलेल्या समस्येवर आपण योग्य तोडगा काढण्यास यशस्वी व्हाल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल, कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतील. आप्तेष्ट व नातेवाईक यांचे चांगले सहकार्य मिळेल. त्यांच्याबरोबर असलेले वादविवाद संपुष्टात येतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : नवीन कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला आपण काही नवनवीन संकल्प घ्याल. सहकुटुंब-मित्रमंडळींसमवेत लहान तसेच मोठ्या अंतराच्या प्रवासाचा आनंद घ्याल. सहकुटुंब तसेच मित्रमंडळींसमवेत सहलीचा आनंद लुटाल, चैनी तसेच करमणुकीवर विशेष मुक्तहस्ते खर्च करावा. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहामधील अडचणी दूर होऊन अथवा विवाह ठरण्यामध्ये विलंब लागत होता अशा तरुण-तरुणींचे विवाह जमतील. नवपरिणितांची स्वप्न पूर्ण होतील. आपले कार्य विनासायास होतील, पण कागदपत्रे नीट वाचून त्यावर कारवाई करावी. कोणत्याही व्यवहारात कागदपत्रे नियम व अटी पाहून करावी अन्यथा त्यातून आपणास त्रास होण्याची दाट शक्यता आहे. घाईगर्दीमध्ये निर्णय घेणे टाळावे. काही वेळेस आपल्या आजूबाजूस काही अप्रिय घटना घडून मानसिक पर्यावरण बिघडण्याची शक्यता आहे. सुरुवातीलाच या गोष्टींची काळजी घेतली तर आपण आपल्या समस्या सहज सोडवू शकाल. नोकरी-व्यवसायात आपले प्रयत्न यशस्वी होऊन आपल्याला हवे ते निकाल हाती येतील. तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील.
शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, २८
अशुभ दिनांक : ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१