राशीभविष्य

जुलै महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जुलै महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

शुभ ग्रहांची साथ संगत

मिथुन राशि वर बुध या ग्रहाचे कारकत्व असते. म्हणजेच बुध मिथुन राशीचा स्वामी आहे. राशीचक्र मधील मिथुन रास आहे. मिथुन राशीचा भाव विषम आहे. लिंग पुरुष आहे. स्वभाव क्रूर आहे. मिथुन राशीचा स्वभाव द्विस्वभाव आहे. ही रास शीर्षोदयी आहे. या राशीची संज्ञा नर आहे. मानवी शरीराचा अवयव छाती आहे. ही रास बुधाची असल्याने सुसंवाद साधते.

शिक्षण : सदरचा कालावधी शिक्षणासाठी आपल्याला अनुकूल आहे. अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे त्याचा फायदा आपण शिक्षणात घेऊ शकाल; परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. हे ओळखा आपण केलेला अभ्यास हा चांगला होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात आपणाला यश देणारे अनुकूल ग्रहमान लाभलेले आहे. थोड्या प्रयत्नांनी सुद्धा चांगले यश प्राप्त करू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रात आपणास चांगल्या संधी मिळतील. अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. परदेशासंबंधी शिक्षणासाठी थोड्याफार अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो; परंतु त्या दिशेने योग्य प्रयत्न केल्यास चांगले यश मिळू शकते.

पारिवारिक : कुटुंब परिवारामध्ये चांगले वातावरण राहील. या अगोदर कुटुंबातील सदस्यांच्या मधील असलेले मतभेद संपुष्टात येतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये आपण सक्षम असाल. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. तसेच घरासाठी काही नवीन खरेदी सुद्धा करू शकाल. स्वतःवरती असलेल्या जबाबदाऱ्या सहजतेने पेलू शकाल. चांगले अधिकार प्राप्त होतील खडतर्ता संपणार आहे. आर्थिक दृष्ट्या चांगल्या घटना घडवून उत्पन्न वाढ होईल. विशिष्ट परिस्थितीचा फायदा मिळेल. नव परिणीतांना जल्लोष करता येईल. असलेली पुत्र चिंता जाईल. त्याचप्रमाणे हितशत्रू पिडा संपेल. विरोधकांचा विरोध संपेल. आर्थिक बाबतीमध्ये दिलासा मिळू शकतो; मात्र कुटुंब परिवारात अनेक कारणांनी खर्चामध्ये झालेली वाढ दिसून येईल.

नोकरी, व्यवसाय, धंदा : सामाजिक तसेच धार्मिककार्यामध्ये सक्रिय योगदान देऊ शकाल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. गुरुजनांचे तसेच कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभेल. त्यामुळे आपण आपला व्यवसाय धंदा वरच्या उंचीवर नेऊ शकाल. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. या कालावधीच्या सुरुवातीपासूनच आपण आत्मविश्वासाने कार्यरत राहणार आहात. आपल्या हातातील कामे वेगाने पूर्ण करू शकाल. नवीन कामे हाती घ्याल. आपल्या कार्यात आपण वरिष्ठ व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी यांच्यापासून चांगले लाभ मिळवू शकाल जवळचे प्रवास होतील प्रवास सफल राहतील. प्रवासामध्ये नवीन ओळखी होतील त्यातून लाभ मिळतील. आपण मुक्तहस्ते खर्च करणार आहात. आरामात दिवस घालवणार आहात.

शुभ दिनांक : 4,5,7,8,9,15,16,20,31

अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23,25,27

कर्क

जीवनामध्ये सुवार्ता मिळतील

कर्क राशि वर चंद्राचे कारकत्व असते, म्हणजेच चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. म्हणून याला चंद्राची रास म्हणतात. ही चौथ्या क्रमांकाची राशी म्हणून ओळखली जाते कर्क राशीचा भाव सम आहे. तसेच कर्क राशीचे लिंग स्त्री आहे. स्वभाव सौम्य आहे. ही रास पृष्ठोदयी आहे. संज्ञा खेकडा आहे. ही रास बहुपद राशी आहे. मानवी शरीराचा हृदय या अवयवावर या राशीचा अंमल असतो.

शिक्षण : सध्याचा चालू कालावधी शिक्षण क्षेत्रासाठी अनुकूल आहे. विशेषतः टेक्निकल या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूल राहील. त्यामुळे आपल्याला विशेष प्रकारचे लाभ होतील. म्हणजे चांगले यश मिळू शकते. परंतु अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे व प्रामाणिकपणे कष्ट घेणे गरजेचे राहील. कला व क्रीडा क्षेत्रात पण चांगले यश मिळवू शकाल. नवीन नवीन संधी प्राप्त होतील. परदेशासंबंधीत शिक्षणासाठी आपल्याकडून चांगले प्रयत्न होतील व त्यामध्ये यश लाभेल. मार्गदर्शन मिळेल त्याबरोबर मदत पण मिळेल.

पारिवारिक : कुटुंब परिवारातील वातावरण वरवर सर्वसामान्य दिसत असले तरी काही वेळेस कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपले स्वतःचे संवाद कौशल्य वापरून गैरसमज दूर करता येतील. घरामध्ये काही आनंदाचे क्षण येतील. त्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण बदलण्यास निमित्त मिळेल. एखाद्या मंगल कार्य करू शकते. निरनिराळ्या व्यक्ती भेटल्यामुळे आनंद वाढेल. नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील खेळीमेळीचे वातावरण राहील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : कुटुंब परिवारातील तरुण- तरुणींचे प्रश्न मिटतील जे तरुण-तरुणी परदेशी आहेत त्यांचा भाग्योदय होऊ शकतो. त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण तरुणांचे विवाह ठरतील. चालू नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते. नोकरी अथवा रोजगार मिळण्यासाठी चांगला कालावधी. शुभ संकेत मिळतील. पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखतीमधून नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता. कॉलेज कॅम्पस मधून नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता कुटुंब परिवारातील वातावरण स्थिर राहून वैवाहिक सौख्य मिळेल. वादविवाद मतभेद मिटतील. व्यापार व्यवसायात प्रगती करू शकाल. त्यातून उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्याने नवीन नियोजन करू शकाल. वस्तूंची खरेदी होऊ शकते. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन करार होतील. परदेशी संबंध येऊ शकतो. आपण अति आत्मविश्वास टाळणे हिताचे ठरेल. कोणतेही काम अपूर्ण ठेवू नका अथवा पुढे ढकलू नका. त्याचप्रमाणे जास्त आक्रमक होण्याची गरज नाही अन्यथा आपण अडचणीत याल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. परदेशी संबंधातून फायदा होईल. वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहिल्यास कोणत्याही प्रसंगातून बाहेर सही सलामत बाहेर पडू शकाल.

शुभ दिनांक : 7,8,9,15,16,20,24,29,30

अशुभ दिनांक : 10, 12, 13, 14, 17, 22, 23, 25,27

राज्यात मान्सून दमदार; मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी; आगामी पाच दिवस धोक्याचे; पालघर, रायगडातील शाळा आज बंद

Navi Mumbai : पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर; नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

डेंग्यूविरोधात चक्क ड्रोन आणि लष्कर तैनात

विजयाबाई नावाचे विद्यापीठ

आजचे राशिभविष्य,२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत