जुलै महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य 
राशीभविष्य

जुलै महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जुलै महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह

प्रश्न संपुष्टात येतील

सिंह रास ही सूर्याची रास आहे. म्हणजेच सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याचे कारकत्व या राशीवरती आढळते. सिंह रास ही स्थिर रास आहे. राशीचक्रातील पाचव्या स्थानी ही रास दर्शविली जाते. सिंह रास ही विषम रास आहे. सिंह राशीचे लिंग पुरुष आहे आणि स्वभाव खूप आहे. या राशीची संज्ञा स्थिर आहे. ही राशी शिर्षोदयी आहे. या राशीची संज्ञा पशु आहे. सिंह रास ही चतुष्पाद राशी आहे. मानवी शरीराचा उदर हा अवयव या राशीच्या कारकत्वाखाली येतो.

शिक्षण : शिक्षणासाठी हा कालावधी अनुकूल आहे, परंतु विशेषतः कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांना हा विशेष अनुकूल असेल त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. प्रसिद्धी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या जातकांना जरा जास्त प्रयत्न करावे लागतील, परंतु प्रयत्नाने चांगले यश प्राप्त होणार आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी थोडे अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. परंतु परदेशी शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. आपले प्रयत्न योग्य दिशेने होत राहतील व त्या प्रयत्नांना यश मिळेल, परंतु हे प्रयत्न सातत्याने आणि प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवणे जरुरी राहील.

पारिवारिक : परिवारातील वातावरण अनुकूल राहील. त्याचप्रमाणे उत्पन्नही चांगले राहील. चांगले लाभ मिळाल्याने घरात खेळीमेळीचे वातावरण राहील व परिवारातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण होतील. एखाद्या मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. नातेवाईक-आप्तेष्टांच्या गाठीभेटीमुळे घरातील वातावरण शांततेचे व आनंदाचे असणार आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये वर्चस्व गाजवता येईल, परंतु आहारविहार व पथ्य पाळा. व्यावसायिक उपक्रमांना चांगले यश मिळेल. जाहिरातीसारख्या माध्यमातून आपल्याला फायदा होईल. काही वेळेस विशेष प्रसंग घडू शकतील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : कुटुंबातील तरुण-तरुणींना मोठे सकारात्मक ग्रहमान लाभलेले आहे. त्यांचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीविषयक प्रश्न मिटतील. नोकरी मिळेल त्याप्रमाणे त्यांना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याच्या संधी मिळतील. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. मदत मिळेल. प्रगती करू शकाल. आपली स्वप्नं साकार होतील. या महिन्यात आपल्याला काही कडू-गोड घटना अनुभवण्यास मिळतील, परंतु आपली ऊर्जा व आत्मविश्वास भरपूर प्रमाणात असणार आहे. त्यामुळे आपण आपला निर्णय सावधगिरीने व पूर्णपणे विचारांती घेणे हिताचे ठरेल. घाईघाईने घेतलेले निर्णय चुकून नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. कोणतीही प्रतिकूल वाटणारी परिस्थिती उत्तरार्धात अनुकूल होईल, मात्र कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका. आपल्याला झेपतील एवढ्या जबाबदाऱ्या स्वीकारा. अति आत्मविश्वास टाळा. नोकरीमध्ये आपल्या अधिकाराच्या कार्यकक्षा ओळखून कार्य पूर्ण करा.

तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल तसेच कुसंगती पासून दूर राहा व्यवसाय धंद्यामध्ये संशयित व्यवहार टाळलेले चांगले आहे तसेच आपले खच्चीकरण पण होऊ देऊ नका आपल्या प्रामाणिकपणे व सातत्याने काम करण्याच्या वृत्तीमुळे आपल्याला श्रेय मिळेल कुटुंबातील मुला मुलींची प्रगती होईल.आपल्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळेल.

शुभ दिनांक: ४, ५, ९, १६, २०, २४, ३१

अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७

कन्या

मनासारखी कामे होतील

कन्या ही रास बुधाची रास आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधाचे कार्यकत्व या राशीवरती आहे. राशीचक्रामधील सहाव्या क्रमांकाची कन्या रास आहे. कन्या रास ही स्वभाव राशी आहे. कन्या राशीचा भाव सम आहे. कन्या राशीचे लिंग स्त्री आहे. त्याचप्रमाणे स्वभाव सौम्य आहे. कन्या रास ही शिर्षोदयी आहे. संज्ञा नर आहे. मानवी शरीराच्या कंबर यावर या राशीचे कारकत्व असते.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे त्याचा आपण जरूर फायदा घ्यावा, परंतु प्रामाणिकपणे कष्ट घ्यावेत व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे लागेल. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश प्राप्त करू शकाल. त्याचप्रमाणे परदेशसंबंधित शिक्षणासाठी अनुकूलता मिळेल. इतरांचे मार्गदर्शन तसेच मदत मिळू शकते. प्रयत्न योग्य दिशेने केल्यास निरनिराळ्या परीक्षांमध्ये स्पर्धात्मक यश प्राप्त करू शकाल.

पारिवारिक : परिवारामध्ये आपल्याला अचानकरीत्या नवीन नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्त खर्च सुद्धा करावा लागेल. विशेषतः मुला-मुलींसाठी खर्च होऊ शकतो. आपल्याप्रति असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल. आपण सहकुटुंब एखाद्या धार्मिक स्थळी भेट देऊ शकाल. आपल्या हातून दानधर्म घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. परंतु आपण शिस्तबद्ध राहून त्याचा फायदा घ्या. वैयक्तिक सुवार्ता मिळू शकतात. त्यामुळे घरातील वातावरण उत्साहवर्धक व आनंदी राहील. नोकरीमध्ये प्रशंसापात्र ठराल. मनासारखी कामे होत राहतील. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल. कार्यमग्न राहाल.

नोकरी, व्यवसाय, धंदा : सदरच्या कालावधीमध्ये आपल्याला अनुकूलता जाणवणार आहे. आपल्या कल्पकतेला वाव मिळेल. आपल्या उपक्रम छंदाचे व्यवसायात रूपांतर करता येईल. या कामी आपल्याला आपल्या मित्रमंडळींतून तसेच परिवारातून मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे गुरुवर्यांचे आशीर्वाद लाभतील. परंतु एखादी गुप्त चिंता आपल्या मनामध्ये सतत राहील. सदरचा कालावधी गतिमान व प्रभावी राहणार आहे. आपण आपला व्यवसाय करू शकाल. आपले उत्पन्न चालू होईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. ते यशस्वी होतील. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सामान्य राहील. दीर्घकाल रखडलेली व्यावसायिक येणी येतील. परंतु नवीन उसनवारी करू नका. इतरांना पैशाच्या स्वरूपात उसने देणे टाळा. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरीत अथवा व्यापार-व्यवसायात अनपेक्षित चांगले बदल झालेले आढळून येतील. हे बदल आपणासाठी फायदेशीर ठरतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद असणार आहे.

त्यामुळे सरकारी कामे लवकर होऊ शकतात आपल्या सकारात्मक दृष्टीने आपणास अनेक लाभ संभवतात. वैवाहिक सुख मिळेल जीवनसाथीची साथ मिळेल कर्ज हवे असल्यास आपणास उपलब्ध होईल व्यवसायिक व खाजगी आयुष्यात समतोल साधाल. स्पर्धेत व मुलाखती मध्ये यश येईल.

शुभ दिनांक: ७, ८, १५, २०, २४, २९, ३०

अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७

आजचे राशिभविष्य, ३ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पावसाळ्यात फरशी पुसल्यानंतरही घरात येतोय कुबट वास? मग एकदा 'हा' उपाय करून पाहाच

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी