राशीभविष्य

जून महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जून महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

विशिष्ट महत्त्वकांक्षा पूर्ण होतील

मृगशीर्ष नक्षत्र तिसरा व चौथा चरण, आद्रा नक्षत्राचे चार चरण, पुनर्वसू नक्षत्राचा पहिला दुसरा व तिसरा चरण, अशा नऊ चरणांनी मिळून मिथुन राशी होते. मृग नक्षत्राची नाडी मध्य, योनी सर्प, गण देव व आराध्य वृक्ष खैर आहे. दान खीर, देवता चंद्र, मुख तिरपक असते. दृष्टी मंद असते. स्वामी मंगळ, तत्त्व वायू व संज्ञा मृदू असते. आद्रा नक्षत्रांमध्ये नाडी आद्य, योनी श्वान, गण मनुष्य आणि आराध्य वृक्ष कृष्णागरू आहे. दान काळी गाय, देवता शिव आहे, मुख उर्व्ध व दृष्टी चिवीट असते, स्वामी राहो तत्त्वजल संज्ञा तीक्ष्ण असते. पुनर्वसु नक्षत्रामध्ये नाडी आद्य, योनी मार्जार, गण देव, आराध्य वृक्ष वेळू हा आहे. दान उडीद व तीळ. देवता आदिती आहे. दृष्टी सुलोचन आहे. स्वामी गुरू तत्त्व वायू, संज्ञा चर आहे.

शिक्षण : विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळू शकते. शिक्षणासाठी अतिशय चांगले ग्रहमान असल्यामुळे आपली प्रगती चांगली राहील. आपली ग्रहणक्षमता चांगली राहणार आहे. एकापेक्षा जास्त विभागात शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा वातावरण चांगले राहील. एकूण सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळणार आहे. तरीसुद्धा अभ्यासात सातत्य, सखोलता व प्रयत्न आवश्यक आहे. कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूलता मिळेल. नवीन संधी चालून येतील. त्याचे सोने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवणे जरुरी आहे. परदेशासंबंधी सुद्धा शिक्षण घेण्यासाठी आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.

पारिवारिक : गतिमान वातावरणाचा लाभ घ्याल. महत्त्वाचे करार मदार व्यवसायात होतील. मुलांची प्रगती होईल. त्यांचे भाग्योदय होतील. कुटुंबात चैन, करमणुकीवर खर्च होईल, शैक्षणिक प्रश्न सुटतील, काही वेळेस अनपेक्षित प्रसंग घडून मनस्थिती बेचैन राहू शकते. आर्थिक व्यावसायिक तेजी राहील. व्यवहारातून गतिमान राहणारा कालावधी. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. मात्र चालू नोकरीमध्ये काही वेळेस समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणे मार्गी लागतील. भातृ चिंता लागू शकते.

नोकरी, व्यवसाय, धंदा : सदरील काळ अनुकूलतेने व्यापलेला असेल. आपली महत्त्वाची कामे आपण पूर्ण करू शकाल. विशेषतः व्यापार व व्यावसायिक दृष्टिकोनातून हा कालावधी अनुकूल आहे, तसेच बरेच दिवस मनात एखादी इच्छा असल्यास ती पूर्ण होऊ शकते. ज्या जातकांनी आपल्या स्वतःचे घर होण्याचे स्वप्न बघितले असेल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न मात्र जरूर हवेत. व्यापार, व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. नोकरीतील घडामोडींतून लाभ होऊ शकतो. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल, कुटुंबातील मुला- मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल, मात्र कुटुंबातील सदस्यांसाठी खर्चात वाढ होईल. ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे व आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक राहील. आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिवर्तन होईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे आपण आपली कामे सहजतेने पार पाडू शकाल.

शुभ दिनांक : 2, 8, 9, 11, 16, 17, 19,20,23,24

अशुभ दिनांक : 13,14,15,28,30

कर्क

नवे व्यावसायिक प्रस्ताव येतील

पुनर्वसू नक्षत्राचा चौथा चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण व आश्लेषा नक्षत्राचे चार चरण असे नऊ चरण मिळून कर्क राशी तयार होते. पुनर्वसू नक्षत्राची नाडी आद्य, योनी मार्जार, गण देव आहे. आराध्य वृक्ष वेळू आहे. दान तीळ व उडीद आहे. देवता आदिती. मुख तीर्पक आहे. दृष्टी सुलोचन आहे. स्वामी गुरू, तत्त्व वायू, संज्ञा चर आहे. पुष्य नक्षत्राची नाडी मध्य योनी मेष आहे. गण देव असून आराध्य वृक्ष पिंपळ आहे. दान रक्त वस्त्र, देवता बृहस्पती मुख ऊर्ध्व, दृष्टी अंध आहे. स्वामी शनी तत्त्व, अग्नी व संज्ञा क्षिप्र आहे. आश्लेषा नक्षत्राची नाडी अंत्य, योनी मार्जार, गण राक्षस, आराध्य वृक्ष नागचाफा आहे. दान तीळ व देवता धेंड सर्प आहे व दृष्टी मंद असते. स्वामी मुख, अधो तत्त्व जल संज्ञा तीक्ष्ण असते.

शिक्षण : कोणतेही शिक्षण घेत असताना आपल्याला अनुकूलता मिळू शकते. शिक्षणासाठी पूर्ण अनुकूल ग्रहण आहे. आपली ग्रहण क्षमता पण चांगली राहील, शिवाय अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. मार्गदर्शन लाभेल, योग्य दिशेने प्रयत्न होतील व प्रयत्न सफल राहतील. प्रयत्नामध्ये अंतर ठेवू नका. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी मिळून आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. परदेशासंबंधी शिक्षणातही चांगले प्रयत्न होतील व प्रयत्न यशस्वी राहतील.

पारिवारिक : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणतीही आर्थिक लहान-मोठी, प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल, काही वेळेस चालू नोकरीत हितशत्रू पिडा छायाग्रस्त करू शकते, कलाकारांना चांगला वाव मिळू शकतो, तरुण-तरुणींचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल. नोकरी मिळू शकते. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. सरकारी कामे होतील. अचानक अकल्पित लाभ होण्याची शक्यता. परदेशगमन शक्य होईल. अडचणी संपुष्टात येतील, मात्र संसर्गजन्य बाधेपासून स्वतःचे संरक्षण करावे लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीमध्ये आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असल्याकारणाने आपल्यासमोरील कामे आपण गतीने पूर्ण करू शकाल. त्याचप्रमाणे काही धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. आपल्यासमोर येणाऱ्या अडचणी अथवा समस्यांवर आपल्या व्यवहार कौशल्याने मात करू शकाल. शत्रू- हितशत्रूंवर विजय मिळवाल. व्यवसाय-धंद्यातील स्पर्धकांवर मात करू शकाल. नवे व्यावसायिक प्रस्ताव येतील. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपली कामे सुरळीत व सहज पार पडतील. तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे एक पाऊल राहाल. तरीही लहान- मोठ्या आर्थिक देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधानता बाळगली पाहिजे. वादग्रस्त येणे वसूल होतील. वैवाहिक सुखासाठी हा कालावधी अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करता येईल. कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 4, 5, 8, 11, 17, 19, 20,23,24

अशुभ दिनांक : 13,14,15,28,30

रे क्षणांच्या संगतीने मी असा भारावलो...

आजचे राशिभविष्य, २ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Environment Day 2026 : फक्त पर्यावरणच नाही! झाडं लावल्याने आरोग्यालाही होतो फायदा

हिमोग्लोबिन कमी आहे? रोज या ८ पदार्थांचा आहारात करा समावेश; रक्त वाढण्यास होईल मदत

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट; ट्राय करा मिक्स फ्रूट लस्सी