डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ रास
वैवाहिक जीवनात आनंद
कुंभ राशीच्या व्यक्तींना एखादी गोष्ट मिळवायची असे ठरवल्यास ती गोष्ट ते मिळवल्याशिवाय ती राहत नाही. ती ते मिळवतातच. आपल्या व्यक्तिमत्त्वाने समोरच्या व्यक्तीस आकर्षित करतात. त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कोणतेही कार्य ते आनंदाने करतात. त्यामुळे यश त्यांना साथ देते. एखादी गोष्ट करण्याचे त्यांनी ठरवले तर ते निश्चितपणे ते करतातच व त्यात सुद्धा यश मिळवतात. त्याशिवाय ते शांत बसत नाहीत. परिश्रमाने व बुद्धीच्या चातुर्याने काम करणाऱ्या व्यक्ती असतात. अभ्यास व बुद्धीच्या जोरावर यश खेचून आणतात, तसेच तंत्रज्ञान, विज्ञान, शोधवृत्ती इत्यादी गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवतात, शिवाय अध्यात्माचाही अभ्यास असतो. कुंभ राशी ही राशीचक्रातील अकरावी रास आहे. या राशीचा अंमल मानवी शरीराच्या जांघवर असतो. विषय रास व पुरुष रास आहे. स्थिर रास द्विपाद वायुतत्त्वाची रास आहे. मकर रास शीर्षोदय व दिगवली रास आहे. ही रास आहे आकाशात कुंभ घेतलेला पुरुष. असा तारका पुंज जो आढळतो त्याच कुंभ रास असे संबोधतात. या राशींच्या जातकामध्ये आत्मविश्वास तसेच उत्तम सहनशक्ती ही गुणवैशिष्ट्य असतात.
शिक्षण : सदरच्या कालावधीमध्ये कुंभ राशीच्या जातकांना चांगली प्रगती करता येईल. म्हणजेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळू शकते, परंतु प्रयत्नांत सातत्य हवे व मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. इतरत्र वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मात्र जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. अपेक्षित यश मिळण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना नवनवीन चांगल्या संधी मिळतील व त्यात यशही मिळेल. अपेक्षित यश साध्य करण्यासाठी त्यांना परिश्रम घेणे गरजेचे आहे. आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न जरूर करावेत म्हणजे सर्वांगीण प्रगती होईल.
पारिवारिक : कुटुंबात परस्पर सामंजस्य ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. कुटुंबात एकोप्याची भावना टिकविण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण स्वतः सकारात्मक राहणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील सदस्यांना समजावून घेणे गरजेचे ठरेल. त्यातच खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. विशेषतः मुला-मुलींच्या मागण्यांमध्ये वाढ होऊ शकते तसेच घरातील उपकरणांसाठी विशेष खर्च करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली राहिल्याने आपण सर्व खर्च करू शकाल तसेच आपली धार्मिकता व अध्यात्मामध्ये रुची वाढणार आहे. खर्च वाढला तरी ताे सकारात्मक गोष्टींसाठी केल्यामुळे आपल्याला समाधान वाटेल. अध्यात्मामुळे शांतता व समाधान लाभेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : नोकरी, व्यवसाय- आपल्या कार्यक्षेत्रात कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन करू नका. म्हणजेच बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणे निश्चितपणे टाळा. ते आपल्या हिताचे ठरेल. विशेषतः खासगी अथवा सरकारी नोकरीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांचा वापर योग्य त्या ठिकाणी व योग्य वेळी करा. आपल्या जबाबदाऱ्याचे भान ठेवा. कोणत्याही लहानमोठ्या प्रलोभनांना बळी पडू नका. सर्व प्रकारचे नियम व अटी पाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहून वैवाहिक जीवनात आनंद उपभोगाल. कुटुंबातील मुला-मुलींकडून शुभवार्ता समजल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. नवविवाहितांना आपत्ययोग आहे, शिवाय राहत्या घराचे प्रश्न सुटतील. स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये प्रवेश करता येऊ शकतो. त्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे परिचय उत्तर विवाह ठरतील. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. कलाकार व खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. अपेक्षित घटना घडतील.
शुभ दिनांक : १, ४, ५, ९, १३, १४, २१, २२, २८, ३०, ३१
अशुभ दिनांक : ७,१०,१९,२५
मीन रास
मंगलकार्य ठरेल
मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनाप्रधान असल्यामुळे कोणत्याही कामात भावनेला जास्त महत्त्व देणाऱ्या व्यक्ती असतात. दुसऱ्या व्यक्तीस मदत करणे, सतत मदत करणे ही त्यांची वृत्ती असते. मदत करण्याची त्यांची मानसिकताच आहे. राशीचक्रातील मीन रास ही बारावी राशी आहे, म्हणजे शेवटची रास आहे. निसर्ग कुंडली ही राशी बाराव्या स्थानी येते. ही गुरूची रास आहे. या राशीचे वर्चस्व मानवी शरीराच्या पावलांवर येते. सौम्य, सम व स्त्री रास आहे. मीन रास ही द्विस्वभाव राशी आहे. त्याचप्रमाणे ती जलतत्त्वाची रास आहे. उभयोशोध व संध्या बली मीन रास आहे. मीन रास बहुप्रसव राशी आहे. आकाशामध्ये ताऱ्यांचा जो समूह दोन उलटसुलट माशांच्या आकाराने दिसतो. त्याला मी जराशी असे म्हणतात. या व्यक्तींचे कर्तृत्व कमी असते तसेच आत्मविश्वास सुद्धा कमी असतो. निष्पाप व निरुपद्रवी अशी ही रास असते. या राशीच्या व्यक्ती सतत कोणत्यातरी दडपणाखाली वावरत असतात. एका अनामिक भीतीचे वातावरण स्वतःभोवती तयार करून घेतात. त्यामुळे सतत भयभीत असतात. जलतत्त्वाची रास असल्याने दयाळू, दानी, इमानदार, परोपकारी, श्रद्धावान असतात. त्याचप्रमाणे निरुपद्रवी, गोड स्वभाव, आकर्षक स्नेहपूर्ण समजूतदारपणा क्षमाशील विचारशील तरल कल्पनाशक्ती असलेले असतात.
शिक्षण : मीन राशीच्या जातकांना या कालावधीमध्ये शिक्षणा घेण्यासाठी अनुकूलता लाभली असली तरी त्यांनी अभ्यासात परिश्रम घेणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे सातत्य पण तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वेळेचे नियोजन करून कुसंगत टाळावी. इतरांच्या म्हणण्यापेक्षा स्वतःच्या मताला जास्त प्राधान्य द्यावे. एकाग्रतेने व एका जागी बसून अभ्यास केला गेला पाहिजे. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळणार आहे, नवनवीन संधी पण उपलब्ध होणार आहेत. परदेशसंबंधी कुठल्याही प्रकारे शैक्षणिक संबंध आल्यास त्याबद्दल जास्त प्रयत्न करावेच लागतील, पण त्यातील काही गोष्टींची बारकाईने चौकशी करणे आवश्यक आहे. ते हिताचे ठरेल. गुरुजनांचे तसेच कुटुंबाचे मार्गदर्शन व मदत मिळेल.
पारिवारिक : कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहणे व ते टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये तसेच नातेवाईक- आप्तेष्ट यांच्यामध्ये लहानसहान कारणांवरून मतभेद अथवा वादविवाद होऊ शकतात. घरातील शांतता व समाधानी वातावरण असण्याकरिता आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहात. खर्चाचे प्रमाण वाढतेच राहणार आहे. आपल्या व्यापार-व्यवसायातून उत्पन्न वाढते राहणार असले तरी विचारविनिमय करूनच खर्च करणे अथवा सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करूनच खर्च करणे आवश्यक आहे अन्यथा कुटुंबात वादविवादांची परिस्थिती निर्माण होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. उष्णताजन्य विकार सतावण्याची शक्यता आहे तसेच जुनाट व्याधी नव्याने उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेसच उपचार करून घेणे आवश्यक ठरणार आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी, व्यवसायात वादविवादापासून दूर राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या लहान लहान प्रसंगांवरून वादविवाद निर्माण होऊ शकतात. अशा प्रसंगांकडे किंवा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. जमीनजुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रात असलेले वादविवाद संपुष्टात येतील. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेले वरील क्षेत्रातील कार्य गतिमान होऊन मार्गी लागतील. त्यातून धनलाभाची शक्यता आहे. थोडे समजुतीचे धोरण आपण स्वीकारणे गरजेचे होऊन बसेल. तडजोड वेळीच स्वीकारावी लागेल. व्यवसाय- धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील.
शुभ दिनांक : २, ८, १४, १५, १७, २०, २१,२२,२८,३०
अशुभ दिनांक : ७, १०, १९, २६