राशीभविष्य

मे महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मे महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष रास

मनाप्रमाणे यश मिळेल

उष्ण प्रकृती, रागीट लहरी पित्त व रक्त विकार यांनी त्रास पावणारा तामसी काटक उतावळा हट्टी प्रवासाची आवड असणारा डोळे पिंगटलाल निग्रही शरीराचा बांधा मध्यम उंच कृषी विद्या व बुद्धी त्या प्रमाणात कमी महत्त्वकांक्षा मोठी दृष्टी उग्र अल्प सुखी पवित्र वर्तणूक ठेवण्याविषयी जपणारा धार्मिक बाबतीत घेऊन वागणारा थोडासा अजगर कोणत्याही प्रकारचे अविर्भाव चेहऱ्यावरती कमी प्रमाणात दाखवणारा भावंडांनी दूर ठेवलेला पित्यापासून दूर राहणारा जन्मभूमीपासून दूर देशी राहण्याची आवड असणारा प्रसंगी दुसऱ्याचे नुकसान करण्यास न घाबरणारा भुतेखेते या वर विश्वास असणारा देवतांच्या उपासनेचा नाद असणारा कमी भोजन करणारा शार्क भाज्यांची आवड असणारा एकांतप्रिय अडखळत बोलणारा दात तोंडाच्या बाहेर असणारा दात अस्वच्छ असणारा दंतरोगी डोके व तोंड यावर व्रण असणारा पाण्याला भिणारा गुडघ्यांच्या मध्ये दुर्बळ सेवा चतुर गुप्तपणे कामे करणारा विशेषतः पुत्र संतती असणारा इत्यादी लक्षणे मेष राशी असलेल्या जातकांच्या मध्ये आढळतात आचारी वाफेच्या यंत्रांच्या जवळ काम करणारा हत्यारे बनवणारा सैनिक एखाद्याचा सूट घेण्यात पटाईत असे लोक या राशीच्या अंमलाखाली येत असतात.

शिक्षण - या राशींच्या जातीकांसाठी सध्याचा कालावधी हा शिक्षणाच्या कोणत्याही शाखेसाठी अनुकूल आहे अनुकूल वातावरणाचा लाभ शिक्षण क्षेत्रात मिळू शकतो त्यामुळे आपल्याला यश सहजी मिळू शकते परंतु त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे राहील एका जागी बसून अभ्यास करणे आवश्यक आहे इतर बाबींकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला हवे म्हणजे अपेक्षित यश साध्य होईल कला क्रीडा क्षेत्रात प्रयत्नशील राहावी लागणार आहे म्हणजे अपेक्षित यश मिळू शकते मात्र स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेतल्यास चांगले प्रयत्न आपल्या हातून घडतील व त्या प्रयत्नांना यश मिळू शकते परदेशातील शिक्षणासंबंधी आशादायक वातावरण तयार होईल त्याचा फायदा घ्या.

पारिवारिक- कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरण्याचे योग आहेत विवाह ठरविण्यासाठी नातलगांची मदत होईल त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील सर्व सदस्य या कामी आपल्याला सहकार्य देतील जे विवाह आत्तापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणांच्यामुळे लांबलेले होते असे विवाह निश्चित होतील घरामध्ये उत्साह वर्धक वातावरण राहील सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल’आर्थिक स्थिती चांगली राहिल्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील कुटुंब परिवारात विद्यार्थ्यांच्याकडून उत्साहवर्धक वार्ता मिळाल्यामुळे आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. कुटुंब परिवारात काही महत्त्वाचे निर्णय आपल्या पुढाकाराने होतील.

नोकरी व्यवसाय धंदा - हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळत राहील फक्त प्रामाणिक प्रयत्न ची गरज आहे आजचे काम उद्यावर ढकलू नका त्याचप्रमाणे स्वतःचे काम स्वतः करा इतरांवर अवलंबून राहू नका कुटुंब परिवारात शुभ समाचार मिळतील कुटुंब परिवारातील विद्यार्थ्यांच्या कडून त्यांच्या प्रगती पर बातम्या कानावर आल्यामुळे घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहिली. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये वातावरण चांगले राहील वरिष्ठांचे सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील अपेक्षित घटना घटित होतील. व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये उत्तम परिस्थिती राहील योजना सफल होतील मात्र सरकारी नियम व कायदे यांचे उल्लंघन करू नका कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले कार्य आपण पूर्ण करा कामगारांचे सहकार्य लाभेल. नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत कारणांनी प्रवास घडू शकतात तरुण-तरुणींनी कुसंगत टाळणे महत्त्वाचे राहील.

शुभ दिनांक - ६,७,१०,११,१८,१९,२१,२४,२८

अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

वृषभ रास

सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल

परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारा भक्ती करणारा क्रांती मान वर्ण गोरा मेदयुक्त भरदार शरीर तजेलदार चेहरा स्वच्छतेची आवड असणारा सौंदर्य पूजक डोळ्यांमध्ये सफेद पणा जास्त असणारा मोहक मांड्या गाल मनगटे तोंड यांच्या आकार गोल असणारा मोठे शरीर मध्यम उंच पाठ तोंड व बरगड्या यावर विशेष चिन्हे असणारा खेळांची आवड निरोगी दगदग सहन करण्यात सहनशील त्यागशील पुरस्काराच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा आळशी स्थिर बुद्धी चांगले चांगले पदार्थ भक्षण करण्याची आवड असणारा सुखी धार्मिक श्रीमंत व धनिक लोकांच्या बरोबर संबंध ठेवणारा शूर शत्रूंवर विजय मिळवणारा माता व पित्याला सुख देणारा वडिलोपार्जित मालमत्तेचा उपभोग घेणारा स्थावर मालमत्तेची आवड विशेष असणारा डाग दागिने व सुंदर कपडे यांची आवड असणारा स्त्री प्रिय विलासी नाना प्रकारचे द्रव्य खर्च करणारा कपयुक्त शरीर जठराग्नी तीव्र कन्या संतती जास्त परंतु संतती संख्या अल्प चपळ निरनिराळ्या विद्यांच्या मध्ये अभिरुची असणारा कुशाग्र बुद्धीचा शेती व पशु यांचे सौख्य बंधू व पुत्र यांचे सुख नसते त्याचप्रमाणे क्षमाशील मध्य व अंत्य व यामध्ये सुखी असणारा मित्रमंडळींच्या पासून सुख भोगणारा इत्यादी लक्षणे वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मध्ये आढळतात शेती बागायती फळ फळावर यांचा उद्योग करणारा हिरवाई मध्ये रमणारा निसर्ग सौंदर्य प्रिय इत्यादी वैशिष्ट्ये वृषभ राशीच्या जातकांमध्ये आढळतात.

शिक्षण - वृषभ राशीच्या जातीकांसाठी सध्याचा कालावधी शिक्षणासाठी अनुकूल असला तरी त्यांना प्रयत्न कमी पडू देऊन चालणार नाही त्यांना कष्ट व परिश्रम केलेच पाहिजेत त्या प्रयत्नांना यश मिळेल प्रयत्न कमी पडून देऊ नयेत स्वतःच्या प्रयत्नांना यश येईल स्वतःच्या कामांच्या बाबतीमध्ये स्वतःच प्रयत्न करावेत इतरांवर जबाबदारी देऊ नये इतरांवर अवलंबून राहू नये अभ्यासाविषयी प्रामाणिक राहावे इतरत्र वेळ वाया घालवू नये मन एकाग्र करून अभ्यास करावा तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये विशेष लागू शकते चांगले यश मिळू शकते परदेशासंबंधीच्या शिक्षणामध्ये यश मिळेल पण त्याप्रमाणे त्या दिशेने योग्य ते प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल इतरांच्या मदतीची फारशी अपेक्षा करू नका.

पारिवारिक - कुटुंब परिवारातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगती पर बातम्या आल्यामुळे परिवारातील वातावरण आनंदी व उत्साही राहील त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील शिक्षणाच्या योजना ठरतील त्याविषयी विशेष लक्ष घालावे लागेल खर्चाचे प्रमाण वाढते राहील कुटुंब परिवारातील इतर सदस्यांचे आपल्याला वाढते सहकार्य मिळू शकते विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कौटुंबिक कार्यातून सफलता मिळेल जीवनामध्ये मिळू शकतात मात्र बेकायदेशीर व्यवहार टाळावेत पौर्णिमेचे जवळ संमिश्र स्वरूपाची फळे मिळू शकतात विचित्र माणसांच्या गाठीभेटीने नियोजन बदलावे लागण्याची शक्यता आहे.

नोकरी व्यवसाय धंदा - कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील त्याचप्रमाणे विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील काहींचे ओळखीतून विवाह ठरू शकतात त्याचप्रमाणे शिक्षणासाठीही अनुकूल कालावधी आहे परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते या कार्यासाठी कुटुंबातून तसेच गुरुजनांकडून मदत मिळू शकते. जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांना नोकरी मिळेल बेरोजगारांना रोजगार मिळेल स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे लाभ होतील तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यश मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकाल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न मात्र करत राहा प्रयत्नांना यश मिळेल खेळाडू व कलाकारांना उत्तम उत्तम संधी मिळतील प्रसिद्धी मिळेल आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील परदेशातूनही संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंब परिवारात उत्तम वातावरण राहील. यशाचे वाढते प्रमाण राहील. आपल्या आत्मविश्वासा मध्ये वृद्धी होऊन आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवू शकाल.

शुभ दिनांक - ३,९,१०,११,१३,१८,१९,२१,२४,२५

अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

मराठा समाजाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका; जरांगेंचा हल्लाबोल, आजपासून उपोषण

Mumbai : सीएनजी २ रुपये, तर पीएनजी ५० पैशांनी महाग; रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अटळ?

Weather Update : हवामान खात्याचा निष्कर्ष कायम; पुन्हा शिक्कामोर्तब, यंदा पाऊस ९० टक्केच

विषारी दारूचे १७ बळी; पुणे-पिंपरीत हाहाकार, ८ जणांना अटक

पेपरफुटी हा तर राष्ट्रद्रोही कट