राशीभविष्य

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ रास

सहकार्यातून लाभ

मानव उंटासारखी पुढे आलेली असतात उंच शरीर पायाचे मांड्यांचे पोटऱ्या पाठ तोंड कंबर पोट इत्यादी अवयवांचे आकार मोठे असतात. वर्ण साधारण सावळा असतो. तोंडवळा साधारण गोल असतो. मिशा कमी असून कंसाकार असतात. नेहमी खा करण्याची सवय असते. कांदा हलवण्याची सवय असते डोक्यावर कमी केस असतात. कपाळ दोन्ही बाजूस निमुळते असते चेहरा देखणा असतो विद्या व्यासंगी असतात. बुद्धिमान कल्पक काव्यबाज तत्त्वज्ञान परस्त्री परपुरुष व परधनाची अभिलाशा करणारे यांना चांगले मित्र लागतात सुगंधी पदार्थांवर विशेष प्रेम असते. कधीकधी मूर्खासारखे वागतात काही वेळेस लहान सहन करणारे राग येऊ शकतो आळशी कठोर अंतकरणाचे असू शकतात. बंधू पासून दूर राहणारा संपत्तीने नेहमी कमी जास्त होत राहते यांच्या संपत्तीचा लोक मच्छर करतात असे असतात. विवेक्षित कार्यक्षेत्राबाहेर फारशी प्रसिद्धी न पावणारा संतती कमी असते अशी कुंभ राशीची वैशिष्ट्ये आहेत.

शिक्षण :- सध्याच्या कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी भाग्यकारक ग्रहमान आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अनुकूल राहील कला व क्रीडा क्षेत्रात तसेच साहित्य क्षेत्रात प्रगती होईल. प्रसिद्धीसह अर्थ मान उंचावेल आपणास चांगले यश प्राप्त होणार आहे. तांत्रिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल तसे सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती असल्या कारणाने घवघवीत यश प्राप्त करण्याच्या संधी मिळतील. परदेशासंबंधी काही प्रयत्न करत असल्यास त्यामध्ये अपेक्षित यश मिळेल या सर्व गोष्टींसाठी सहजता मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत सुद्धा अपेक्षित यश प्राप्त करू शकाल.

पारिवारिक :- आर्थिक बाबतीत स्थिरता मिळवल्यामुळे मनाप्रमाणे खर्च करू शकाल घराच्या नूतनीकरणासाठी तसेच घरातील सदस्यांच्या वाढत्या वागण्या पूर्ण करण्यासाठी खर्च होऊ शकतो. विशेषता मुलांच्यासाठी खर्च होईल कुटुंब परिवारात एखादे शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे आर्थिक बचतही होईल नवीन गुंतवणूक करू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील घरातील वातावरण आनंदाने उत्साही राहील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- चालू नोकरीमध्ये राजकारण व गटबाजी पासून दूर राहा त्यातून त्रासदायक प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या विरुद्ध काही वेळेस घटनाक्रम घटीत होण्याची शक्यता आहे. सावध रहा आपल्या कामाच्या ज्ञानामध्ये अद्यावत राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शिस्त पाळा कायद्याच्या चौकटीत राहून आपली कार्य पूर्ण करा व्यवसाय धंद्यात जर काही आर्थिक मदत लागत असेल, तर बँकांची कामे होतील. कर्ज मंजुरी होईल परंतु कर्ज मंजूर होताना अडचणी निर्माण होऊ शकतात अथवा त्रास होऊ शकतो. काही वेळेस चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊ शकतात विचित्र स्वभावाच्या व्यक्तींचा संपर्क वाढू शकतो त्यामुळे सरळ होणाऱ्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सावध रहा योग्य माणसांच्या संपर्कात राहिल्याच फायदा होईल.

शुभ दिनांक : - १, ३, ४, १०, १२, १३, १५,१६, २३, २९, ३०

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

मीन रास

विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ

परधन परजल यांचा भोक्ता स्त्री व वस्त्रे यात निमग्न गोंडस स्थूल ठेंगू शरीर असते. काहीसे सुंदर शरीर उंच कपाळ मोठे असते डोळे फार मोठे किंवा फार लहान असतात. हात पाय वगैरे अवयव आखूड असतात जनेंद्रिय फार बारीक असू शकते. वर्ण साधारण सावळा असतो विद्या व बुद्धी साधारण असते संतती विशेष असते त्यात संतती कन्या जास्त राहते. स्त्री वश असतात गुप्तधन भोगणारा कीर्तीची हाव असणारा जनावरांची आवड असते भित्रे असतात कर्तबगारी विशेष नसते सात्विक असतात.

शिक्षण :- शिक्षण क्षेत्रासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे. आपल्या आत्मविश्वासात आपल्याला वाढ करावी लागणार आहे आत्मविश्वास आवश्यक असणार आहे. त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता व धाडस यामध्ये वाढ होऊन आपण चांगले निर्णय घेऊ शकाल. आपले निर्णय योग्य ठरतील त्यामुळे तुमची भाग्यवंती निश्चितच आहे. टेक्निकल क्षेत्रात तसेच सर्वच क्षेत्रात आपण यश प्राप्त करू शकाल कला व क्रीडा क्षेत्रात महत्व जास्त सराव व कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. परदेशा संबंधी प्रयत्न करताना सावधगिरीने आर्थिक व्यवहार करा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. खरे खोटेपणा याची खात्री करूनच पुढचे पाऊल उचलावे बाकी उज्वल यश मिळेल.

पारिवारिक :- कुटुंब परिवारात स्थिरता राहणार आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहील कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहिल्याने आपण समाधानी राहाल. योग्य निर्णय घेतले जातील आनंद व मनोरंजनाचे कार्यक्रम कुटुंब होण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंब परिवारातील स्त्री सदस्यांनी आपल्या बोलण्यावर व वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील नाहीतर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. वाद विवादाची शक्यता नाकारता येत नाही खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. धार्मिक कारणाने अथवा पर्यटनाच्या निमित्ताने सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. आपल्यातून दानधर्म होऊ शकतो एकूणच कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. समाधानी रहाल इतरांवर अवलंबून राहणार नाही.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये सरकारी नियम व अटींचे पालन अतिशय महत्त्वाचे ठरेल. कायद्याच्या चौकटीत राहून आपली कामे पूर्ण करा चालू नोकरीमध्ये शिस्तबद्धता पाळा वरिष्ठांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. अधिकार क्षेत्र रुंदावेल आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून आपली कार्य पूर्ण करा, तसेच आपले अधिकार क्षेत्र सांभाळा कोणत्याही कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन करू नका ते अंगाशी येऊ शकते. शिवाय बदनामी ही मिळेल सरकारी नियम पाळा वाहन चालवताना वाहतुकीचे नियमांचे पालन करा. कलाकार खेळाडू यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होतील परदेश गमनाच्या ही संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होईल तसेच प्रसिद्धी मिळू शकते. कोर्ट प्रकरणी जर काही चालले असतील तर त्यातून तडजोडीचा मार्ग काढणे हितकारक ठरेल.

शुभ दिनांक : - ३, ४, ७, १२, १३, १५,१६,२५,२६,३०

अशुभ दिनांक : - २,५,६,१४,१८,१९,३०

“मी कोणत्या गोंधळात अडकलेय”! राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझिलच्या मॉडेलची पहिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

...अखेर जंजिरा किल्ला पुन्हा खुला; आठवडाभराच्या बंदीनंतर हवामान पूर्ववत