राशीभविष्य

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष रास

उत्पन्नात वृद्धी

वसंत संपताना सुरू होणारी पहिली रास ही मेष आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी प्रथम स्थानावर येते. या राशीचे स्वामी मंगळ आहे. ही चर राशी आहे. तशीच ती अग्नितत्त्वाची आहे. पृष्ठोदय तसेच अल्पप्रसव राशी आहे. मेष राशीचे प्रतीक मेंढा आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप डोक्यावर आहे. मेष राशी असलेल्या व्यक्ती डोक्याचा प्रचंड प्रमाणात वापर करतात. त्यामुळे सतत शौर्य, धाडस व साहसयुक्त कार्य करत असतात. यांच्या अंगात धडाडी व आक्रमकता असते.

शिक्षण :- सदरचा कालावधी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामध्ये आपण यश प्राप्त करू शकाल. आपल्या प्रयत्नांमुळे सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांना स्पर्धापरीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी काळ विशेष अनुकूल राहील, मात्र अभ्यासामध्ये प्रामाणिकता व सातत्या हवे. जास्त प्रयत्नांची जोडही द्यावी लागेल. वेळेचे नियोजन उपयुक्त ठरू शकते. इतरत्र वेळ वाया घालवता कामा नये. त्याचप्रमाणे चांगली संगत हवी. परदेशी संबंध साधण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये सत्यता पडताळून बघणे गरजेचे ठरेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी प्राप्त होतील. प्रसिद्धीही मिळू शकते.

पारिवारिक :- आपल्याला कुटुंबात जास्तीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. खर्चाचे प्रमाण व्यस्त राहील. त्यामुळे काहीसे अस्वस्थ राहाल. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकडे वेळेतच लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी चांगला राहणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास तुम्ही समर्थ राहाल, कारण उत्पन्नही चांगले राहणार आहेे. सहकुटुंब पर्यटनासाठी अथवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी प्रवास घटित होण्याची शक्यता आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- साधारणपणे चालू कालावधीमध्ये आपल्याला मिश्र फळे मिळण्याची शक्यता जास्त आहे. कधी चांगले वातावरण राहिल्यामुळे उत्साही व आनंदी राहाल, तर कधी मनाप्रमाणे घटना घटित होत नसल्याने मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मताला उचित प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी राजकारण व गटबाजीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. आपल्या कामांमध्ये मग्न राहिल्यास इतर कोणताही त्रास जाणवणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या कामाविषयीच्या ज्ञानामध्ये अद्यावत राहणे गरजेचे राहील. आपल्या सहकाऱ्यांच्या चुका काढत बसण्याची ही वेळ नाही. आपल्याला विशेष प्रयत्नांची गरज राहील हे लक्षात ठेवा तसेच आपल्या कामांमध्ये शिस्त पाळणे व वेळेचे महत्त्व जाणणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही वेळेस आपल्याला शत्रूंचा त्रास जाणवू शकतो, परंतु शत्रूंच्या कारवायांवर आपण यशस्वीपणे मात करू शकाल. व्यवसाय-धंद्यामध्ये कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना अधिक सावधानतेने राहणे महत्त्वाचे ठरेल. उधारीचे प्रमाण कमी करावे. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन ओळखी होतील. त्या ओळखी पडताळून बघणे गरजेचे ठरेल. कोणावरही अतिविश्वास ठेवणे धाडसाचे ठरू शकते. जुगारसदृश व्यवहार करू नका. शेअर मार्केट, सट्टा बाजार यापासून अलिप्त राहा. नवीन गुंतवणूक करू नका. केलेल्या गुंतवणुकीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तरुण-तरुणींना त्यांच्या संगतीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल. चालू असलेले मालमत्ता, जमीनजुमला या क्षेत्रातील व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे परिवारामध्ये वादविवाद घडण्याची शक्यता आहे.

शुभ दिनांक : - १, २, ४, ५, ८, १३, १४, १५, १७, २१, २२, २८, ३०, ३१

अशुभ दिनांक : -

वृषभ रास

ओळखीतून लाभ

निसर्ग कुंडलिक वृषभ रास दुसऱ्या क्रमांकावर येते. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ही स्थिर रास असून पृथ्वी तत्त्वाची रास आहे. पृष्ठोदयी रास आहे. रात्रीवली मध्यम प्रसव चतुष्पाद राशी आहे. वृषभ राशीचे प्रतीक बैल आहे. बैलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो कष्टकरी आहे. बलवान आहे. हीच वैशिष्ट्ये वृषभ रास असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. वर्चस्व हे मुखावर असते. यांची चाल धिमी असते. सुस्तपणा. स्वच्छता टापटिप राहणे या व्यक्तींना आवडते. कलात्मक स्वरूपाच्या गोष्टी त्यांना आवडतात. तसेच या व्यक्तींना वादविवाद आवडत नाहीत. या व्यक्ती प्रेमळ असतात. दृढता, परोपकारी, स्पष्टता, स्थिर विचार, संसारिक सुखाचे दर्शन या व्यक्तींमध्ये आढळते.

शिक्षण :- कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणासाठी अथवा सर्व क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मदत मिळू शकते. परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. गुरुजनांची मदत तसेच मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातून पाठिंबा मिळेल. तसेच सहकार्य राहील. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी हव्या होत्या त्या मिळतील. अपेक्षा पूर्ण होतील. प्रसिद्धीबरोबरच अर्थार्जन होईल, नवनवीन संधी उपलब्ध होतील. साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या जातकांना विशेष अनुकूल कालावधी आहे.

पारिवारिक :- परिवारातील वातावरण आध्यात्मिक राहणार आहे, मात्र घरात शांत वातावरण राहण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आपल्या संवाद कौशल्याने आपण वादविवाद टाळले पाहिजेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकमेकांबद्दल होणारे गैरसमज टाळता येतील. कुटुंबात एखादे शुभकार्य अथवा मंगलकार्य होण्याची शक्यता आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सर्वप्रथम आपण आपल्या प्रकृतीची व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरेल. छोट्या मोठ्या आरोग्यविषयक कटकटी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेसच लक्ष दिल्यास त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे कुटुंबामधील व्यक्तींच्या आरोग्याकडेही लक्ष देणे हितकारक ठरेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांविषयी लक्ष देणे गरजेचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात जर काही कोर्टविषयक प्रकरणे चालू असतील तर त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विशेष लक्ष दिल्यास त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल. व्यवसाय-धंद्यामध्ये उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, शिवाय उधारी वसूल होईल. आपण आपली देणे चुकती करू शकाल. ताणतणावरहित वातावरणाचा अनुभव येईल. शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. त्यांना योग्य उत्तर देऊ शकाल. परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. एखादे मंगलकार्य अथवा धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे. नातेवाईक-आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. चालू नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळाल्यामुळे आपण समाधानी राहाल. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. चालू नोकरीमध्ये विशेष उत्पन्न वाढेल. व्यवसायामध्ये भागीदाराच्या मताला विशेष महत्त्व दिल्यामुळे ते फायद्याचे प्रमाण वाढेल. त्याचा व्यवसायासाठी विशेष उपयोग होईल. व्यवसायामध्ये नवीन संकल्पनांचा वापर व्यवसायासाठी पोषक ठरेल. त्यामुळे उलाढालीवर परिणाम होईल. स्पर्धकांच्या वर मात करता येईल. परिणामतः उलाढाल वाढवून उत्पन्नात वाढ होईल. काहींना स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. व्यवसाय विस्तारासाठी योग्य कालावधी आहे.

शुभ दिनांक : - २, ५, ४, १३, १५, १७, २०, २४, ३०, ३१

अशुभ दिनांक : ७,१०,१९,२५

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई

‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर; जगातील पहिलेच उद्योगपती ठरले