राशीभविष्य

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ

ओळखी-मध्यस्थीतून कामे होतील

कुंभ राशीवर शनी महाराजांचे कारकत्व असेल. कुंभ रास असलेल्या व्यक्तीची बौद्धिक पात्रता चांगली असते. कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करण्याची त्यांना सवय असते. कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रवासाची फारशी आवड नसते. त्यांना बदल फारसे आवडत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतेही झालेले बदल ते सहजासहजी स्वीकारत नाहीत. कुंभ रास ही पुरुष रास आहे. या राशीचे कर्तृत्ववान जातक दिसून येतात. वास्तू तसेच नोकरी, व्यवसाय व आपलं कार्यक्षेत्र यामध्ये स्थिरता ठेवण्याची आवड असते. त्यांना सर्व कामांमध्ये स्थिरता अधिक आवडते तसेच त्यांच्या वागण्या-बोलण्यातही फारसे बदल घडत नाहीत.

शिक्षण : शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. नवनवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परदेशीही संधी मिळू शकतात, परंतु आपल्या सर्वांमध्ये अथवा परिश्रमामध्ये आणि प्रयत्नांमध्ये उणीव ठेवू नका. वेळेचे व्यवस्थापन करा म्हणजे ताण येणार नाही. आत्ता थोडे जास्त कष्ट घेतल्यास भविष्यकाळात त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतील. आयटीच्या क्षेत्रात विशेष मिळण्याची शक्यता आहे. परदेशासंबंधी शिक्षणात चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत सुद्धा अपेक्षित येशू प्राप्त करू शकाल. पण आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य तऱ्हेने ठेवणे गरजेचे आहे, तसेच परिश्रमामध्ये सुद्धा कमी पडून देऊ नका.

पारिवारिक : एकूणच या कालावधीमधील ग्रहण आपल्याला साथ न देणारे ठरल्याने आपणास प्रयत्नांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल. ग्रहमान परिस्थितीजन्य साथ न देणारे आहे. भान ठेवून सर्व प्रकारचे व्यवहार करा. आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगा. आपल्या कार्यक्षेत्रात सावध राहा. नुकसानीचे भव्य आहे. त्यामुळे कोणताही लहान-मोठा निर्णय घेताना पूर्ण विचारांती घेणे गरजेचे ठरेल. उत्तरार्धामध्ये ग्रहमान बदलू शकते. केलेली कामे फलद्रूप होतील. अपेक्षित यश प्राप्त होईल. ओळखीमधून कामे होतील. प्रेमिकांनी मात्र सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरेल. थट्टामस्करी टाळावी.

नोकरी, व्यवसाय व धंदा : आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच नोकरी, व्यवसाय, धंद्यामध्ये सरकारी नियम व अटींचे पालन अतिशय महत्त्वाचे ठरेल. कायद्याच्या चौकटीत राहून आपली कामे पूर्ण करा. चालू नोकरीमध्ये शिस्तबद्धता पाळा. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. सरकारी नोकरीमध्ये अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. अधिकार क्षेत्र रुंदावेल. आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून आपली कामे पूर्ण करा तसेच आपले अधिकार क्षेत्र सांभाळा. कोणत्याही कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन करू नका. ते अंगलट येऊ शकते, शिवाय बदनामीही होईल. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. कलाकार, खेळाडूंना नवनवीन संधी उपलब्ध होतील. परदेशगमनाची संधीही मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल तसेच प्रसिद्धी मिळू शकते.

शुभ दिनांक : 1,4,5,12,16,20,21,26

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

मीन

तरुण-तरुणींना योग्य मार्ग सापडेल

मीन रास ही गुरूची, त्याचप्रमाणे जलतत्त्वाचीही रास आहे. मीन रास ही द्विस्वभाव राशी आहे. निर्णय घेताना कधी कधी गोंधळेपण मीन रास असलेल्या व्यक्तींमध्ये आढळते तसेच आत्मविश्वासाचीही कमतरता असते. इतरांची मदत सतत घेण्याची वृत्ती असते अथवा बऱ्याचदा ते इतरांवर अवलंबून असतात. आपले निर्णय घेताना त्यांना मदतीची आवश्यकता भासते. मीन राशीच्या व्यक्तींना महत्त्वाचे निर्णय अचूक ठरण्यासाठी ते विचारपूर्वक घेण्याची गरज असते. वागणे आणि बोलणे यामध्ये काही वेळा मेळ नसतो. एखादे कार्य करण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागल्यास ते काम अर्धवट सोडू शकतात. कोणत्याही गोष्टीचे सखोल ज्ञान नसते. त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता भासू शकते. काही वेळेस ते चांगले कार्य करू शकतात.

शिक्षण : शिक्षण घेण्यासाठी सदरचा कालावधी उपयुक्त ठरू शकतो. शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही शाखेसाठी आपण शिक्षण व्यवस्थित घेऊ शकता. अनुकूल ग्रहणाचा फायदा मिळू शकतो, परंतु अभ्यास करताना तो सातत्याने होईल याकडे लक्ष द्या. वेळेचे नियोजन करा. त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल. परिश्रम अथवा प्रयत्न यशस्वी होतील. टेक्निकल क्षेत्रामध्ये विशेष यश लाभेल. आपले कष्ट यशदायी ठरतील. कला व क्रीडा क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, पण जास्त कष्ट घेण्याची तयारी ठेवा. शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.

पारिवारिक : या कालावधीमध्ये आपल्यावर परमेश्वराची कृपा राहील. आपण महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. तरुण-तरुणींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन मार्ग मिळू शकतात. त्यांचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याची संधी मिळू शकेल, ज्या जातकांच्या विवाह ठरण्यामधील अडचणी येत होत्या असे विवाह ठरतील. काहींच्या ओळखीतून विवाह होऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच व्यवसाय, धंदा, नोकरी यामध्ये अनुकूलता लाभेल. बदलत्या सरकारी धोरणांचा फायदा होईल. सरकारी पाठबळातून लाभ मिळेल. नवपरिणितांनी पौर्णिमा, अमावस्येजवळ आचारसंहिता पाळावी ते हितकारक ठरेल.

नोकरी, व्यवसाय व धंदा : महिन्यात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. उष्णताजन्य विकारांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. विशेषतः प्रवासामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबात वादविवादांना स्थान देऊ नका. ज्या प्रसंगांमुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. त्याचप्रमाणे प्रेमिकांचे विवाह निश्चित होतील. आपल्या मनाप्रमाणे जीवनसाथी मिळाल्याने तरुण-तरुणी खुश राहतील. चालू नोकरीमध्ये अनुकूलता राहील, मात्र वरिष्ठांच्या मताला प्राधान्य देणे विसरू नका.

शुभ दिनांक : 1,4,16,20,21,26,29

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च