टाकाऊ पानांचं टिकाऊ चामडं 
अक्षररंग

टाकाऊ पानांचं टिकाऊ चामडं

कचरा समजून फेकून दिलेल्या अननसाच्या पानांमध्येही एक मोठं 'सोनं' दडलंय! या पानांपासून तयार होतंय प्राण्यांना इजा न करणारे चामडे आणि त्यातून शेतकरी, प्राणी आणि निसर्ग या तिघांचाही फायदा होतोय.

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

कचरा समजून फेकून दिलेल्या अननसाच्या पानांमध्येही एक मोठं 'सोनं' दडलंय! या पानांपासून तयार होतंय प्राण्यांना इजा न करणारे चामडे आणि त्यातून शेतकरी, प्राणी आणि निसर्ग या तिघांचाही फायदा होतोय.

मुलांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे. सगळीकडे मस्त हिरवंगार झालंय, हिरव्यागार कुरणांमध्ये चरणारी गुरं आणि सगळीकडे फुललेली विविध रंगांची फुलं बघून किती छान वाटत नाही? आता काही दिवसांनी रक्षाबंधनाचा सण वेईल. मज्जाच मज्जा। या वेळी कितीतरी भेटवस्तूंची देवाणघेवाण देखील बहीण-भावंडांमध्ये होईल. राखीसाठी दुकानें सजायला देखील लागली आहेत. पण हे काय ? आमचे काही निसर्गमित्र मात्र काही वस्तू बघून इतके नाराज का झाले आहेत?

शेजारच्या चिनूला तर छोटूशी चामडधाची पर्स बघून खूपच वाईट बाटलं. त्याला कारण विचारलं तर महणाला, "ही चामड्याची आहे ना? आपल्यासाठी हे सगळे प्राणी किती बलिदान देतात! त्यांच्यापासून ही तयार केली आहे ना? वापरताना पण वाईट वाटेल."

तेका दुकानदार काका हसले आणि महणाले, "नाही बरं का चिन्! आता मात्र प्राणिहत्या करून चामड्याच्या वस्तू तयार करायला हळूहळू जगभरात बंदीच घालायला सुरुवात झाली आहे! माणसाने हळूहळू प्रगती केली आहे.

आधी प्राण्यांचा वापर ओझं वाहायला केला, मग गाड्यांचा शोध लागला. गाड्यांमुळे जेव्हा प्रदूषण व्हायला लागलं, तेव्हा आता बायोगॅस (जैविक इंधन) आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित गाड्यांदेखील निघाल्या आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याची जवाबदारी आता आपली आहे. तसंच या चामड्यार्चदेखील झालं आहे बरं का! आता झाडांपासून चामर्ड तयार करायला सुरुवात झाली आहे आणि तेही झाडं कापून निसर्गाची हानी करूम नाही, तर 'टाकाऊतून टिकाऊ' करण्याकडे हा कल आहे." असं महणून दुकानदार काकांनी चिनूला एक भन्नाट गोष्ट सांगितली.

डॉ. कारमेल हिजोसा या संशोधक महिलेने चक्क आपलं चविष्ट फळ 'अननसा'पासून चामर्ड तयार केलं आहे, 'पिनाटेक्स' नावाचं, एरवी अननसाची कापणी झाली की, अननसाची पानं वायाय जातात! आता त्याचं काय करायचं असा विचार कारमेल बाईना पडला आणि त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. अननसाच्या पानांपासून लांब धागे तयार केले. बऱ्याच प्रयोगांनंतर अननसाच्या झाडाच्या लांब पानांपासून अगदी चामड्यासारखं दिसणारं दणकट, टिकाऊ कापड- ज्याला लेदर माणतात- ते तयार होतं असं त्यांना दिसलं आणि त्यांनी मग अननसाच्या या चामड्यापासून बऱ्याच वस्तू तयार करायला सुरुवात केली.

चिनू तर खूपच खूश झाला ऐकून! त्याने ती निसर्गमित्र पर्स पटकन घेतली, दुकानदार काकांना धन्यवाद द्यायला तो विसरला नाही. मुलांनो, असे निसर्गमित्र घरच्या घरी तुम्हीही होऊ शकता. जुन्या कपड्यांच्या पिशव्या बनवून त्या वापरू शकता आणि आपला खारीचा वाटा देऊन निसर्ग वाचवायला तयार होऊ शकता. आहे ना मस्त! चला तर, आता अननस दिसलं की निदान खाऊन झाल्यावर त्याच्या शिलकीतून खत तयार करून बघू!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल

एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख