ANI
बिझनेस

गृह खात्यासाठी २.१९ लाख कोटी! सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफला जास्त हिस्सा

केंद्रीय अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठी दोन लाख १९ हजार ६४३.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे एक लाख ४३ हजार २७५.९० कोटी रुपये सीआरपीएफ, बीएसएफ आणि सीआयएसएफ यांसारख्या केंद्रीय दलांसाठी देण्यात येणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठी दोन लाख १९ हजार ६४३.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे एक लाख ४३ हजार २७५.९० कोटी रुपये सीआरपीएफ, बीएसएफ आणि सीआयएसएफ यांसारख्या केंद्रीय दलांसाठी देण्यात येणार आहेत. या केंद्रीय दलांवर अंतर्गत सुरक्षा, सीमा सुरक्षा आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

यापूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठी दोन लाख दोन हजार ८६८.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अर्थमंत्री सीतारामन यांनी ४२ हजार २७७.७४ कोटी रुपये जम्मू-काश्मीरसाठी दिले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.

अर्थसंकल्पात पाच हजार ९८५.८२ कोटी रुपये अंदमान आणि निकोबार बेटांसाठी, पाच हजार ८६२.६२ कोटी रुपये चंडीगडसाठी, पाच हजार ९८५ कोटी रुपये लडाखसाठी, दोन हजार ६४८.९७ कोटी रुपये दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीवसाठी आणि एक हजार ४९०.१० कोटी रुपये लक्षद्वीपसाठी देण्यात आले आहेत.

निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला ३१ हजार ५४३.२० कोटी, बीएसएफला २५ हजार ४७२.४४ कोटी, सीआयएफएसला १४ हजार ३३१.८९ कोटी, आयटीबीरपीला आठ हजार ६३४.२१ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार