बिझनेस

हिंडेनबर्गचे नवे आरोप अदानी समूहाने फेटाळले

अमेरिकी गुंतवणूकदार संस्था हिंडेनबर्गने आरोपाचा नवा धुरळा पुन्हा उडविला आहे. अदानी समुहाशी संबंधित काही कंपन्या तसेच व्यक्तींची स्वीस खाती गोठविण्यात आल्याचा नवा आरोप करण्यात आला. मात्र...

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकी गुंतवणूकदार संस्था हिंडेनबर्गने आरोपाचा नवा धुरळा पुन्हा उडविला आहे. अदानी समुहाशी संबंधित काही कंपन्या तसेच व्यक्तींची स्वीस खाती गोठविण्यात आल्याचा नवा आरोप करण्यात आला. मात्र, अदानी समूहाने हे आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले असून स्वीस बँकेच्या कोणत्याही व्यवहारात सहभाग नसल्याचा दावा केला आहे.

अदानी समूहाशी संबंधित कंपन्यांचे व्यवहार पाहणाऱ्या तैवानस्थित नागरिकाकडून स्वीस बँकेच्या खात्यात रक्कम असून पैकी ३१.१० कोटी डॉलर रुपये गोठविण्यात आल्याचे हिंडनबर्गने म्हटले होते.

‘जेपीसी’ची काँग्रेसची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने अदानींच्या तपासावर नियंत्रण ठेवावे आणि संपूर्ण व्याप्तीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, अदानी समुहाबाबतचे व्यवहार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकूणच या प्रकरणात संशयाचे वातावरण गडद होत आहे. हे सारे आता न्यायालयाच्या कक्षेत यायला हवे.

काँग्रेसच्या आरोपांचा बुच दाम्पत्याकडून इन्कार

दुसरीकडे, देशातील लोकप्रिय उद्योग समुहातील कंपन्यांमधून पती धवल बुच यांना उत्पन्न मिळत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा सेबी अध्यक्षांनी इन्कार केला आहे. याबाबत करण्यात आलेले आरोप हे जाहीर माहितीवर आधारित असून त्यात कोणतेही तत्थ्य नसल्याचे माधवी पुरी - बुच व धवल बुच यांनी शुक्रवारी एक संयुक्त पत्र जाहीर करत स्पष्ट केले आहे.

सेबी अध्यक्षाविरुद्ध लोकपालांकडे तक्रार

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी - बुच यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी लोकपालांकडे तक्रार दाखल केली. लोकपालने ३० दिवसांच्या आत सीबीआय तसेच ईडीकडे प्राथमिक तपासासाठी आणि नंतर संपूर्ण एफआयआर चौकशीसाठी पाठवावे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. प्राथमिक चौकशीसाठी अंमलबजावणी संचलनालय किंवा सीबीआयला आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. मोइत्रा यांनी ऑनलाइन तक्रार आणि त्याची प्रत सादर केल्याचा स्क्रीनशॉट आपल्या समाजमाध्यम खात्यावर जारी केला आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी