गौतम अदानी 
बिझनेस

अदानी समूहाचा अदानी विल्मरमधून बाहेर पडण्याचा निर्णय; २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी उभारणार

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहाने सोमवारी एफएमसीजी संयुक्त उपक्रम अदानी विल्मारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.

Swapnil S

नवी दिल्ली : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहाने सोमवारी एफएमसीजी संयुक्त उपक्रम अदानी विल्मारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. सिंगापूरच्या भागीदाराला आणि खुल्या बाजारात आपला संपूर्ण हिस्सा विकून अंदाजे ३ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त रक्कम अदानी समूह उभारणार आहे. त्याचबरोबर अदानीचे नामनिर्देशित संचालक अदानी विल्मर लिमिटेडच्या संचालक मंडळातून पायउतार होतील. ३१ मार्च २०२५ पूर्वी हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एका निवेदनात, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने सांगितले की, ते विल्मर इंटरनॅशनलला ३१.०६ टक्के हिस्सा विकणार आहेत. किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी १३ टक्के खुल्या बाजारात विकले जातील. अदानी विल्मारला ३१.०६ टक्के हिस्सा १२,३१४ कोटींना विकणार आहे (शेअरची किंमत रु. ३०५ पेक्षा जास्त नाही), तर ओएफएसद्वारे शेअर विक्री केल्यास एकूण २ अब्ज डॉलर (सुमारे १७ ,१०० कोटी) पेक्षा जास्त उभे राहतील. हिस्सा विक्रीनंतर अदानी एंटरप्रायजेस लि. कंपनी अदानी विल्मर लि.मधून पूर्णपणे बाहेर पडेल, असे कंपनीने म्हटले आहे. हिस्सा विक्रीतून मिळालेल्या पैशाचा वापर अदानी एंटरप्रायजेस लि.च्या मुख्य पायाभूत सुविधा व्यवसायात वाढ करण्यासाठी केला जाईल.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य